घरमहाराष्ट्रगडचिरोलीत नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; चालकासह १५ जवान शहीद

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; चालकासह १५ जवान शहीद

Subscribe

महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पोलिसांच्या २ गाड्यांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोलीमधील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेड्या गावाजवळील ही घटना घडली. या हल्ल्यात वाहनचालकासह १५ जवान शहीद झाल्याचे समजते.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पोलिसांच्या २ गाड्यांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोलीमधील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेड्या गावाजवळील ही घटना घडली. पोलिसांच्या शीर्घ कृती दलावर नक्षलवाद्यांचा हल्ला पोलिसांच्या २ गाड्या नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटा लावून उडवल्या आहेत. या दोन गाड्यांमध्ये एकूण २५ जवान होते. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले तर एका वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी गडचिरोली आणि नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. मदतीसाठी पोलिसांची अधिकची कुमक मागवण्यात आली आहे.

- Advertisement -

या स्फोटाअगोदर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काही काळ चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. या हल्ल्यात वाहनचालकासह १५ जवान शहीद झाल्याची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली असून नक्षलवाद्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी, प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. शहीद जवानांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणं गरजेच – मुनगंटीवार 

अतिशय दुर्दैवी आणि नक्षलवाद्यांचा निषेध करावा अशी ही घटना आहे. काल मध्यरात्री नक्षलवाद्यांनी काही कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या पेटवण्याचं काम केलं. साधारणतः गडचिरोली लोकसभेतील निवडणुकीत नक्षलवाद्यांनी आवाहन करूनही त्या भागातील लोकांनी त्यांना न जुमानता मोठ्या संख्येने मतदान केले आणि त्याचा राग म्हणून नक्षलवाद्यांनी गाड्या जाळल्या. तसेच हा पोलिसांच्या ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात सांगायचे झाले तर नुकतीच पोलीस विभागाकडून माहिती घेतली असून ती गाडी पूर्णपणे बॉम्ब लावून उडवण्यात आली आहे. यामध्ये १५ जवान आणि गाडीचा चालक शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या संबंधीत महासंचालकांशी चर्चा केली. देशामधील नक्षलवाद संपवणे ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्र दिन. एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय. पुढच्या २३ मे पर्यंत अजून तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तोपर्यंत मतदानासाठी लोकं बाहेर पडणार. हे सर्व लोकशाहीच्या विजयासाठी करत आहे. दुसरीकडे नक्षलवादी लाल रक्ताच्या क्रांतीचा विचार करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणं हे आपल्यासाठी आव्हान आहे. हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करण्याची गरज आहे. मूठभर लोकांना हाताशी घेऊन लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये आमच्या सुरक्षा जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जोरदार निषेध. मी सर्व शूर सैनिकांना सलाम करतो. त्यांचे बलिदान कधीच विसरले जाणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. हल्ला करणाऱ्यांना कधीच माफ केले जाणार नाही.’

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी देखील ट्विट केले आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘गडचिरोली सी – ६० फोर्समधील १५ पोलीस कर्मचारी आज नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. तर वाहनचालकाचा या  हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे कळाल्यानंतर खूप दु:ख झाले. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. आम्ही सशक्त प्रयत्न करुन लढा देऊ. मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी फोनवरुन बोललो आणि त्यांना गडचिरोलीतील परिस्थितीबद्दल सांगितले.’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -