घरमहाराष्ट्रमुदतपूर्व प्रसूतीविषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?

मुदतपूर्व प्रसूतीविषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

Subscribe

जगभरात दरवर्षी १५ दशलक्ष बालकांचा जन्म मुदतपूर्व होतो. या मुदतपूर्व प्रसूतीमुळे दरवर्षी जगभरात १ दशलक्ष बालकांचा मृत्यू होतो.

गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी प्रसूती झालेल्या बाळांना मुदतपूर्व प्रसूती किंवा अपरिपक्व (प्रिमॅच्युअर) बालके म्हणतात. मुदतपूर्व प्रसूतीमुळे बालकांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. त्याचबरोबर यामुळे अनेक बालकांचा मृत्यूही होतो. जगभरात दरवर्षी १५ दशलक्ष बालकांचा जन्म मुदतपूर्व होतो. या मुदतपूर्व प्रसूतीमुळे दरवर्षी जगभरात १ दशलक्ष बालकांचा मृत्यू होतो. गर्भाशयाची खुंटलेली वाढ आणि मुदतपूर्व प्रसूतीमुळे बालकांना अपंगत्व देखील येण्याचा धोका असतो.

हेही वाचा – प्रसुती कायद्यातील बदलामुळे महिलांच्या नोकरीवर गदा?

- Advertisement -

काय म्हणाले तज्ज्ञ डॉक्टर?

याविषयी खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट डॉ. अभिजीत म्हापणकर म्हणतात, ‘ नवजात बालकांचा मृत्यू आणि त्यांच्यात येणारे व्यंग यासाठी मुदतपूर्व प्रसूती हे एक प्रमुख कारण असते. मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळाची काळजी घेणे आव्हानात्मक असते आणि त्याचा कुटुंबावर प्रचंड ताण येतो. तंत्रज्ञान आणि एनआयसीयू सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांसोबतच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी, अँटिनॅटल तपासणी, गरोदर मातांसाठी पोषण कार्यक्रम, अपरिहार्य मुदतपूर्व प्रसूतींमध्ये अँटिनॅटल स्टेरॉइड्स, निओनॅटल केअर- कांगारू मदर केअर, स्तनपानाचे महत्त्व यामुळे या बालकांचा जीव वाचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली गेली आहे. देशातील ग्रामीण भागांमध्ये एनआयसीयू सुविधा उपलब्ध झाल्या तर आपल्या देशातील मुदतपूर्व प्रसूत झालेली बालके जगण्याचा दर हा विकसित देशांएवढा असेल.’

हेही वाचा – गर्भाशय प्रत्यारोपणातून जन्मली देशातील पहिली मुलगी

- Advertisement -

मूदतपूर्व प्रसूतीच्या बालकांसाठी ‘हे’ आहेत उपाय

मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बालकांमध्ये वेळ अत्यंत मौल्यवान असतो. त्यामुळे ज्या महिलांच्या गर्भधारणेमध्ये गुंतागुंत असते किंवा मुदतपूर्व प्रसूती होण्याची शक्यता असते अशा मातेची प्रसूती अद्ययावत उपकरणे उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये व्हावी, जेणेकरून नवजात बालकाच्या प्रकृतीमध्ये असलेली समस्या व्यवस्थित हाताळली जाईल. निओनॅटोलॉजी ही बालरोगशास्त्राची एक शाखा असून या शाखेत तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांतर्फे बाळाची पहिल्या महत्त्वाच्या महिन्यांमध्ये बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते.

भारतात सर्वाधिक मूदतपूर्व प्रसूती

कोणत्याही इतर देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मुदतपूर्व प्रसूती होतात. सुमारे ३.३ दशलक्ष बाळांची दरवर्षी मुदतपूर्व प्रसूती होते आणि थेट मुदतपूर्व गुंतागुंतीमुळे ३ लाख बालकांचा मृत्यू होतो. मुदतपूर्व प्रसूती टाळण्यासाठी आणि अशा बालकांचा जीव वाचावा यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. यात आरोग्य केंद्रांमध्ये अँटिनॅटल कोर्टिकॉस्टिरॉइड्स (एसीएस) वापरण्याबाबत २०१४ साली प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. नवजात बालकांचे फुफ्फुस पूर्ण विकसित व्हावे यासाठी २४ ते ३४ आठवड्यांदरम्यान प्रसूती होण्याची शक्यता असलेल्या मातांच्या बाबतीत एसीएसची अंमलबजावणी केली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आली आहे.


हेही वाचा – बारामतीच्या घोणस सापाची परळच्या ‘हाफकीन’मध्ये प्रसुती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -