घरमहाराष्ट्रविधान परिषद निवडणुकीत भाजपने केली सेनेची कोंडी

विधान परिषद निवडणुकीत भाजपने केली सेनेची कोंडी

Subscribe

राज्य विधान परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत एका मतास १० लाखांपासून २५ लाखांपर्यंत भाव चढला होता. या निवडणुकीत सेनेचा पाडाव करण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. कोकण आणि नाशिक मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीला मदत करण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांची स्थिती बिकट झाल्याचे दिसत होते.

सेनेला चित करण्याचा भाजपचा प्रयत्न

- Advertisement -

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. तर सेना आणि भाजपमध्येही युती झाली होती. मात्र लोकसभेच्या पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपने त्या पक्षाचा वचपा काढण्याचे ठरवले. त्यानुसार कोकण आणि नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय स्थनिक पातळीवर घेतल्याचे सांगण्यात आले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर सेनेने नरेंद्र दराडे यांना उभे केले आहे. भाजपने परवेझ कोकणी यांना उमेदवारी दिली असली तरी कोकणी यांची मते राष्ट्रवादीकडे वळवून सेनेला चित करण्याचा भाजपने प्रयत्न चालवल्याचे स्पष्ट दिसत होते.
एका मताची  किंमत १० लाख?

काल रात्री ज्युपिटर हॉटेलात मतदार असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले होते. तिथे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन येणार होते. ते आले नाहीत. मात्र मतदान कुठे करायचे याविषयी उपस्थितांना पदाधिकाऱ्यांंकरवी मार्गदर्शन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काल पार पडलेल्या निवडणुकीवेळी मतदारांचा १० लाखांपासून २५ लाखांपर्यंत भाव चढला होता, असे सांगितले जात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -