घरमहाराष्ट्रनाशिकमहाशिवरात्रीलाच 'त्र्यंबकेश्वर'चे कर्मचारी संपावर!

महाशिवरात्रीलाच ‘त्र्यंबकेश्वर’चे कर्मचारी संपावर!

Subscribe

'समान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे' ही संपावर गेलेल्या मंदिर कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे.

आज देशभरात महाशिवरात्रीचा उस्तव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. राज्यातही शिवभक्तांनी सकाळपासून विविध शिवमंदिरांबाहेर रांगा लावल्याचं चित्र दिसत आहे. शिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांमध्येही पूजा, महाआरती, रोषणाई, फुलांची आरास, सजावट असं प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुमारे १२० हून अधिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन महाशिवरात्रीच्या काळात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये कर्मचारी हजर नाहीत. मात्र, या संपामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं समजतंय. विविध सामाजिक संघटने स्वयंसेवक आजच्या दिवशी मंदिरात सेवा बजावणार आहेत. यामुळे दर्शनासाठी आलेल्यांची गैरसोय होणार नाही.

संपाचे कारण काय?

उपलब्ध माहितीनुसार, ‘समान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे’ ही संपावर गेलेल्या मंदिर कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. याशिवाय कर्मचा-यांना साप्ताहिक सुट्टी मिळावी, महिला कर्मचा-यांना प्रसुती या अशा काही मागण्या करत कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. मंदिर समितीचे विश्वस्त पंकज भुतडा यांनी या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्याचे आवाहन कर्मचारी संघटनांना केले आहे. तसंच पर्यायी व्यवस्थेमुळे आजच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात. देवाची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या ‘नाशिक’मध्ये असलेलं हे त्र्यंबकेश्वर १२ ज्योतिर्लिंगापैकी आहे. त्यामुळे या स्थानाला विशेष महत्व आहे. मुबंई, पुण्यासह राज्यभरातूल लाखो भाविक वर्षभर या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -