घरमहाराष्ट्रदूधातील भेसळ ८ टक्क्यांनी वाढली, सीजीएसआयचा अहवाल

दूधातील भेसळ ८ टक्क्यांनी वाढली, सीजीएसआयचा अहवाल

Subscribe

भेसळयुक्त दुधांमध्ये ब्रँडेड दुधात समावेश देखील आहे. ६९० नमुन्यांपैकी २२८ दुधांचे नमुने हे ब्रँडेड दुधाचे होते. तर उरलेले दूध हे खुले होते.

दूधात भेसळ करण्याचे प्रकार वाढले असून दिवसेंदिवस या संदर्भातील अनेक व्हिडिओ समोर येत आहे. आता या भेसळमध्ये ८ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया (CGSI) च्या तपासणीत समोर आले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यातील दुधाचे नमुने तपासण्यात आले. ६९० नमुन्यांची तपासणी करताना त्यामधील ५३९ दुधाच्या नमुन्यातील दूधामध्ये भेसळ झाल्याचे आढळले. तर उरलेल्या १५१ दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नियमांचे पालन केल्याचे समोर आले. पण महत्वाची बाब अशी की, दूध भेसळीचे प्रमाण ७० टक्क्यांवरुन ७८ टक्क्यांवर गेले आहे. म्हणजे तब्बल ८ टक्क्यांनी भेसळ वाढली आहे.

ब्रँडेड दुधातही भेसळ

भेसळयुक्त दुधांमध्ये ब्रँडेड दुधात समावेश देखील आहे. ६९० नमुन्यांपैकी २२८ दुधांचे नमुने हे ब्रँडेड दुधाचे होते. तर उरलेले दूध हे खुले होते. यात जास्त करुन दूधात पाणी मिसळण्याचा प्रकार समोर आला आहे. या शिवाय दूधात काही अन्य पदार्थ देखील मिसळले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असल्याचे सीजीएसआयकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दुधामध्ये इतके फॅट आवश्यक

दुधामध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीचा परीणाम त्यातील फॅटवरदेखील होतो. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणनुसार प्रत्येक प्राण्याच्या दुधाच्या फॅटची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार गायीच्या दुधात ३.२, म्हशीच्या दुधात ६.०, उंटाच्या दुधात २.० आणि शेळीच्या दुधात ३.५ इतके फॅट असणे आवश्यक आहे. जर फॅट यापेक्षा कमी नोंदवले गेले तर दूध उत्पादक दुधासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करत नाही, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -