घरमहाराष्ट्रमुंबई-ठाण्यातील खासगी सीएनजी पंप मालक ४ जानेवारीपासून बेमुदत संपावर

मुंबई-ठाण्यातील खासगी सीएनजी पंप मालक ४ जानेवारीपासून बेमुदत संपावर

Subscribe

मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यातील खासगी सीएनजी पंप चालकांनी ४ जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. नव्या धोरणानुसार महानगर गॅस कंपनीकडून १५ वर्षांचा भाडेकरार करण्यात येणार आहे. शिवाय, धोरण जाचक असल्याचं सीएनजी पंप मालकांचं म्हणणं आहे. यामुळेच बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे, असं युनायटेड सीएनजी डीलर असोसिएशन या संघटनेने सांगितलं. या बेमुदत बंदचा फटका वाहतुकीवर होणार असून टॅक्सी-रिक्षाचालकांना देखील या बंदचा फटका बसणार आहे.

युनायटेड सीएनजी डीलर असोसिएशनने ठाण्यात मंगळवारी बैठक आयोजित केली होती. पंपासाठी स्वत: ची जमीन आणि यंत्रणा उभारण्यासाठी स्वत: पैसे खर्च करणाऱ्या पंपचालकांवर नवी पॉलिसी लादून जमिनीसह त्यांचा पंपच ताब्यात घेण्याचा महानगर गॅसचा डाव असल्याचा आरोप सीएनजी डिलर्स असोसिएशनं केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुमारे ४० खासगी सीएनजी पंप आहेत. मात्र, महानगर गॅस कंपनीने आता नवे धोरण आणलं आहे. या धोरणानुसार सीएनजीच्या खासगी पंप मालकांना महानगर गॅस कंपनीसोबत १५ वर्षे भाडेकरार करावा लागणार आहे.

- Advertisement -

नव्या धोरणात सीएनजी पंप असलेल्या परिसरातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्यास थेट करार रद्द करण्यात येणार आहे. शिवाय, यासारख्या अनेक जाचक अटी नव्या धोरणात आहेत. त्यामुळे या नव्या धोरणांविरोधात खासगी सीएनजी पंप मालकांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पेट्रोल डीलर संघटनाही आमच्या मागण्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या पंपावरील सीएनजी पंप बंद ठेवणार असल्याचं युनायटेड सीएनजी डीलर असोसिएशन समितीचे सदस्य संजय कदम यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -