Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

वकिल तरूण चतुरभाई परमार यांनी केलेल्या तक्रारीवरून किर्तीकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी किर्तीकुमार यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

Related Story

- Advertisement -

नागपूरच्या सुधार प्रन्यास घरकुल योजनेत घर मिळवण्यासाठी खोटी शपथपत्रे दाखल केल्याप्रकरणी चिमूरचे आमदार किर्तीकुमार म्हणजेच बंटी भांगडिया यांच्याविरोधात फसवणूकाचा गुन्हा दाखल केला आहे. वकिल तरूण चतुरभाई परमार यांनी केलेल्या तक्रारीवरून किर्तीकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी किर्तीकुमार यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

किर्तीकुमार यांनी नासुप्रच्या लोक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मार्च २००७ ते जून २००८ या दरम्यान एबी ३०३ क्रमांकाचा गाळा खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी खोटी शपथपत्रे सादर केली होती. किर्तीकुमार यांनी गैरप्रकारे मालमत्ता बळकावून सार्वजनिक फसवणूक केल्याने इमामवाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे २००७ ते २००९ या दरम्यान किर्तीकुमार यांना अशाप्रकारे खोटी शपथपत्रे सादर करून कुटुंबातील सदस्यांच्या नावे किंवा स्वत:च्या नावे घरे किंवा गाळे घेऊन ते आपल्या मालकीचे नसल्याचा दावा करत त्यांनी आयुर्वेदिक ले आऊट येथील नासुप्रच्या घरकुल योजनेतील इमारत डीममधील २०२ चा गाळा विकत घेतला होता. या प्रकरणी सक्करगरा पोलिसांनी किर्तीकुमार यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा देखल केला.

- Advertisement -

इमामवाडी आणि सक्करदरा यांनी न्यायालयाने किर्तीकुमार यांच्यावर दाखल केलेल्या दोन्ही गुन्ह्यांचे तपास अहवाल न्यायालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी किर्तीकुमार यांच्यावर गुन्हे दाखल केले. किर्तीकुमार यांनी गैरमार्गाने खोटे शपथपत्र सादर करून योजनेअंतर्गत गाळे मिळवल्याची याचिका न्यायालयात दाखल केली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व्हि. एम. देशमुख यांच्यावर समोर या दोन्ही प्रकरणाची सुनावणी करण्यात आली.


हेही वाचा – हात जोडून उभे राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही

- Advertisement -

 

- Advertisement -