घरमहाराष्ट्रनाशिकसम्राट बिल्डर्सच्या गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळली; ४ ठार तर १ गंभीर

सम्राट बिल्डर्सच्या गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळली; ४ ठार तर १ गंभीर

Subscribe

गंगापूररोडवरील सोमेश्वर कॉलनीलगत असलेल्या अपना घर या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घटना

गंगापूररोडवरील सम्राट ग्रुपच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अपना घर या गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी, २ जुलैला सकाळी घडली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, एका जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे बांधकाम मजुरांच्या असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळी ९ वाजेदरम्यान घडलेलेल्या या दुर्घटनेत अब्दुल बारी (वय ३२, रा. बिहार), बेबी सहनबी खातून (वय २८, रा. पश्चिम बंगाल), सुदाम गोहिर (वय १९, ओडिशा) आणि अनामी धना चंदन (वय ५०, रा. दिल्ली) यांचा मृत्यू झाला. तर, शेख मजहर अलम (रा. पश्चिम बंगाल) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोतीवाला कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या कॅनलरोडच्या चौफुलीवर नाशिकमधील बिल्डर सुजॉय गुप्ता यांच्या सम्राट ग्रुपकडून अपना घर हा मोठा गृहप्रकल्प उभारला जातो आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथील काही व्यक्ती बांधकाम मजूर म्हणून काम करत आहेत. मजुर सहकुटुंब राहत असल्याने त्यांच्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी १० ते १५ फुट उंचीची सिमेंटची पाण्याची टाकी बांधलेली होती. मंगळवारी सकाळच्या सुमारास काही मजुर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी टाकीखाली थांबलेले असतानाच, ही टाकी अचानक कोसळली. त्याखाली दबून तीन मजूर जागीच ठार झाले. तर, अन्य दोघा गंभीर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -