घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये १४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये १४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

Subscribe

नाशिक शहरात करोनाबाधित रूग्णांसह मृत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शुक्रवारी (दि.२६) दिवसभरात जिल्ह्यात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर १०, नाशिक ग्रामीण २ आणि मालेगावातील २ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १३७ नवे रूग्ण करोनाबाधित आढळून आले. यात नाशिक शहर ९१, नाशिक ग्रामीण ३१ आणि जिल्ह्याबाहेरील १५ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ४९३ करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात १ हजार ६९६ बाधित रूग्ण आहेत.

नाशिक शहरासह जिल्हाभर करोनाने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे. रूग्णसेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी करोनाबाधित येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १ हजार ९११ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 391, नाशिक शहर 660, मालेगाव शहर 790, जिल्ह्याबाहेरील 70 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ३६९ करोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहे. यात नाशिक ग्रामीण 267, नाशिक शहर 945, मालेगाव शहर 119, जिल्ह्याबाहेरील 38रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजवर १९ हजार ६६६ संशयित रूग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात ३ हजार ४९३ रूग्ण करोनाबाधित आढळून आले असून अद्यापपावेतो ७१२ अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण 133, नाशिक शहर 229 आणि मालेगाव शहर 350 रूग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

शहरात ८ पुरुष, २ महिलांचा मृत्यू

नाशिक शहरात शुक्रवारी दिवसभरात १० बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात बाधित मृतांचा आकडा ९१ वर पोहचला आहे. फुले मार्केट, कोकणी दरबारजवळ येथील ८० वर्षीय पुरुष १६ जून रोजी रूग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा शुक्रवारी (दि.२६) मृत्यू झाला. काझी गढी, कुंभारवाडा येथील ४० वर्षीय महिला २२ जून रोजी रूग्णालयात दाखल झाली होती. त्यांचा २३ जून रोजी मृत्यू झाला. म्हसोबा नगर, गीतेमळा, नाशिकरोड येथील ६५ वर्षीय पुरुष २२ जून रोजी रूग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा २३ जून मृत्यू झाला. माहेश्वरी अपार्टमेंट, जैन मंदिराजवळ, शिंगाडा तलाव येथील ५६ वर्षीय पुरुष २२ जून २०२० रोजी रूग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा २३ जून रोजी मृत्यू झाला. भीमवाडी, गंजमाळ येथील ४४ वर्षीय पुरुष २३ जून रोजी रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा २४ जून रोजी मृत्यू झाला. आडगाव येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुष २३ जून रोजी रूग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा २४ जून रोजी मृत्यू झाला. शिवगंगा अपार्टमेंट, जाधव कॉलनी, मखमलाबाद रोड येथील ६६ वर्षीय पुरुष २२ जून रोजी दाखल झाला होता. त्यांचा २५ जून रोजी मृत्यू झाला. पिंजार घाट, दूधबाजार येथील ७५ वर्षीय पुरुष २२ जून रोजी रूग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा २३ जून रोजी मृत्यू झाला. मनोहर मार्केट, सारडा सर्कल येथील ५२ वर्षीय महिला २१ जून रोजी रूग्णालयात दाखल झाली होती. त्यांचा २२ जून रोजी मृत्यू झाला. रविवार कारंजा येथील ३० वर्षीय पुरुष १४ जून रोजी रूग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा २३ जून रोजी मृत्यू झाला.

- Advertisement -

६२४ रूग्ण दाखल
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२६) ६२४ संशयित रूग्णांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने आणि बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेले रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. यात जिल्हा रूग्णालय १७, नाशिक महापालिका रूग्णालये ४३४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १२, मालेगाव रूग्णालय ९ आणि नाशिक ग्रामीण रूग्णालयात १५२ रूग्ण दाखल झाले आहेत.

पॉझिटिव्ह रूग्ण-३४९३ (मृत-२१३)
नाशिक ग्रामीण-६९६ (मृत-३८)
नाशिक शहर-१६९६ (मृत-९१)
मालेगाव शहर-९८२ (मृत-७३)
जिल्ह्याबाहेरील-११९ (मृत-११)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -