नाशिकमध्ये चिमुकलीवर अत्याचार; एकाला अटक

संतप्त नागरिकांनी संशयित नराधमाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Nashik
five year old girl sexually assaulted by an elderly man
वृद्धाकडून ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच नाशिकमध्ये ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचर केल्याचा प्रकार अंबड परिसरात उघडकीस आला आहे. संतप्त नागरिकांनी संशयित नराधमाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कैलास रामू कोकणी (२६, रा. अंबड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा – नागपूरमध्ये दगडाने ठेचून ५ वर्षीय बालिकेची हत्या, अत्याचाराचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी नगर, अंबड येथे काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह रहायला आले होते. या ठिकाणी आधीच रहात असलेल्या कैलास कोकणी याने कुटुंबातील चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील गच्चीत नेले. त्यानंतर कार्टून दाखविण्याचे आमिषाने तिला तो स्वतः रहात असलेल्या खोलीत घेऊन गेला. दरवाजा आतून बंद करून त्याने चिमुकलीवर अत्याचार केला. काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यावेळी संशयित कोकणीला विचारण्यासाठी आईने हाक मारली असता त्याने दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजार्‍यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बालिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. भेदरलेल्या मुलीने आईला माहिती दिल्यावर घडलेला प्रकार उघडकीस आला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी संशयित कोकणीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.