घरमहाराष्ट्रनाशिकसातपूरला भवानी मातेचा यात्रोत्सव जल्लोषात

सातपूरला भवानी मातेचा यात्रोत्सव जल्लोषात

Subscribe

सातपूरला गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानीमाता यात्रोस्तवात अर्धनारीनटेश्वरच्या वेशभूषेत श्री गणेशाने बारागाड्या ओढल्या.

सातपूरला गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानीमाता यात्रोस्तवात अर्धनारीनटेश्वरच्या वेशभूषेत श्री गणेशाने बारागाड्या ओढल्या. लोकसभा निवडणुकीमुळे यंदाच्या यात्रोत्सवात इच्छुकांसह कार्यकर्त्यांचीही गर्दी बघावयास मिळत होती. यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गर्दीवर नियंत्रण राखण्यात पोलिसांची प्रचंड दमछाक झाल्याचे दिसून आले.

नववर्ष आणि गुढीपाढव्याला सातपूरच्या भवानी माता याञोत्सवात श्री गणेशा मंगेश प्रकाश निगळ या तरुणाने गेल्या तीन वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची निगळ घराण्याची परंपरा राखली. या युवकाने सातपूर गावातील वेशीवर असलेव्या मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात भक्तिभावाने पूजन करून तसेच बारागाड्या ओढून याञोत्सवाचा प्रारंभ केला. यावेळी सातपूरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फ़ा गर्दी केली होती.

- Advertisement -

बारागाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी याञोत्सवास लोकसभा निवडणुकीतील उमेदवार खासदार हेमंत गोडसे, समीर भुजबळ, आमदार सीमा हिरे, अपुर्व हिरे, पवन पवार, जयंत जाधव, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, रिपाइं जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, नगरसेविका दीक्षा लोंढे, माधुरी बोलकर, सीमा निगळ, जि. प. सदस्या अमृता पवार, उपमहापौर प्रथमेश गिते, भिवानंद काळे आदींसह विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा समितीच्या वतीने शांताराम निगळ, गोकुळ निगळ, उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन घाटोळ, कार्याध्यक्ष हर्षल काळे, सागर निगळ, किरण निगळ, योगेश गांगुर्डे, गोरख काठे, विलास निगळ, भावेश निर्माण, हर्षल आहेर, नवनाथ आहेर, महेश बंदावने, विजय बेंडकुळे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -