घरमहाराष्ट्रनाशिकभाजपचा पुन्हा हिंदुत्वाचा पुकार

भाजपचा पुन्हा हिंदुत्वाचा पुकार

Subscribe

लोकसभा निवडणुकीनिमित्त आजवर भारतीय सैनिकांचे शौर्य आणि शहिदांच्या नावाने तापलेले राजकारण आता पून्हा एकदा धर्मवादाकडे वळू लागले आहे.

लोकसभा निवडणुकीनिमित्त आजवर भारतीय सैनिकांचे शौर्य आणि शहिदांच्या नावाने तापलेले राजकारण आता पून्हा एकदा धर्मवादाकडे वळू लागले आहे. नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या सभेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुस्लिम समाजाची मते आम्हाला मिळणारच नसून याच धर्तीवर हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले. दुसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘रझाकारांना पाठिंबा देणार्‍या ओवीसीच्या पाठी तुम्ही उभे राहणार का, असे आवाहन करीत दलीत मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीनेही दलित आणि मुस्लिम मतांनाच लक्ष्य केले आहे.

कोणत्याही निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढवल्या जाव्यात हा आदर्शवाद असला तरी निवडणुकीच्या गरमागरमीतील चित्र काही वेगळेच असते. आजकाल प्रत्येक निवडणुका या जातीय आणि धार्मिक समीकरणांभोवती गोवल्या जातात. नाशिक मतदारसंघापुरता विचार केल्यास अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीने मराठा समाजाच्या मतांचे धृव्रीकरण होऊन त्याचा फटका विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना बसेल, असे बालेले जाते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना मिळणार्‍या दलित आणि मुस्लिम मतांचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे समीर भुजबळ यांना बसेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण प्रारंभापासूनच चर्चेत आहे. देव, देश आणि धर्मासाठी ही निवडणूक असल्याचे सांगत शिवसेनेने मुस्लिमांवर फार न बोलण्याची सावध भूमिका घेतली आहे. मात्र, दलित मतांचे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत ओवीसीवर जहरी टीका केली.

- Advertisement -

भाजपने यंदाच्या निवडणुकीत आजवर लष्कराचे कतृत्व, शहिदांचे बलीदान, शेतकर्‍यांचे प्रश्न या मुद्यांभोवतीच निवडणूक रंगवली होती. अखेरच्या टप्प्यात त्यांनी ‘धर्मास्त्र’ उगारले दिसते. हुतात्मा कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याची झलक दिली. त्यांनी हिंदू धर्मियांच्या मतांचे ध्रुव्रीकरण होत असल्याचे सांगतानाच मुस्लिम धर्मिय एकत्र आहेत, तसे हिंदू का एकत्र होत नाही, असा सवाल केला. मात्र, अशा वक्तव्यांमुळे भाजपच्या जवळपास आलेला मुस्लिम समाज दुखावला जाण्याची भीती पक्षातील जुन्या जाणत्यांनी व्यक्त केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर, असे वक्तव्य करून पालकमंत्र्यांना नक्की काय साध्य करायचे असा प्रश्नही निर्माण होत आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

या निवडणुकीत माझ्या दलित आणि बौद्ध बांधवांना धोक्याचा इशारा देतोय. संभाजीनगरला जाऊन औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवणारा ओवीसी तुमच्या आडून येतोय. ओवीसीचा एमआयएम पक्ष निजामाला पाठींबा देण्यासाठी जन्माला आला होता. रझाकारांना पाठींबा देणारा हा पक्ष आहे.

- Advertisement -

काय म्हणाले गिरीश महाजन

जामनेरमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांमध्ये आठ मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सांगितले की, आम्ही कमळाच्या फुलाला मतदान करणार नाही. धुळे मतदार संघातही सुभाष भामरे घाबरले आहेत. गेल्या निवडणुकीत मालेगावमधील मतदानाच्या पेट्या उघडल्या, तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराला १ लाख ३५ हजार मतदान मिळाले होते. तर डॉ. भामरे यांना चार हजार मतदान मिळाले होते. पाच लाखवाले जर एकत्र येऊन एकाच उमेदवाराला मतदान करत असतील, तर उर्वरित १५ लाख आम्ही एकत्र का येत नाही?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -