घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी काँग्रेसची दिंडोरी लोकसभा जम्बो कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसची दिंडोरी लोकसभा जम्बो कार्यकारिणी जाहीर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ग्रामीण विभागाची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी शनिवारी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीत ११ उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस, ११ चिटणीस, १० संघटक सचिव आणि एका खजिनदाराचा अशा एकूण ४१ जणांना संधी देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ग्रामीण विभागाची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी शनिवारी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीत ११ उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस, ११ चिटणीस, १० संघटक सचिव आणि एका खजिनदाराचा अशा एकूण ४१ जणांना संधी देण्यात आली आहे. यात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील सहा आणि व मालेगाव लोकसभा मतदार संघातील तीन अशा ९ विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. कामकाजासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

ग्रामीण कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांपैकी रोज दोन पदाधिकारी नाशिक येथील राष्ट्रवादी भवन या कार्यालयात त्यांना नेमून दिलेल्या दिवशी हजर राहून पक्षाच्या कामकाजात सहभाग घेणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हा पदाधिकार्‍यांमधून लवकरच तालुकावार निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. पगार यांनी सांगितले. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्याने पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून पक्षाचे जिल्हा संपर्क नेते, जिल्ह्यातील पक्षाचे माजी मंत्री, आजी-माजी खासदार व आमदार, प्रदेश प्रतिनिधी, पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, जिल्ह्यातील पक्षाचे नगरपालिका व नगर पंचायतींचे अध्यक्ष व सदस्य यांचाही पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश राहणार आहे.

- Advertisement -

अशी आहे कार्यकारिणी

उपाध्यक्ष : साहेबराव पाटील (नांदगाव), राधाकिसन सोनवणे (येवला), मायावती पगारे (येवला), नारायण हिरे (कळवण), हरिश्चंद्र भवर (निफाड), अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे (भगूर), सुनील कबाडे (चांदवड), अशोक सावंत (बागलाण), जयवंत सोनवणे (सटाणा), जगदीश पवार (देवळा)

सरचिटणीस : नंदकुमार कदम (निफाड), योगेश पाटील (मनमाड), नितीन मोहिते (नाशिक), विलास बोरस्ते (निफाड), भागवतराव सोनवणे (येवला), शांताराम देसाई (मालेगाव), बबन शिंदे (लासलगाव), राजेंद्र पवार (कळवण), शंकरराव काठे (दिंडोरी)

- Advertisement -

चिटणीस : रतन हलवर (मालेगाव), उत्तम आहेर (चांदवड), गुलाबराव चव्हाण (मालेगाव), विलास सानप (नाशिक), नितीन सोनवणे (सटाणा), गिरीश बोरसे (मालेगाव), सुनील पेलमहाले (दिंडोरी), उत्तम सहाणे (इगतपुरी), आबासाहेब देशमुख (दिंडोरी), योगेश बोरसे (नांदगाव), विजय दशपुते (मालेगाव)

संघटक सचिव : विजय जाधव (चांदवड), खंडेराव चौधरी (निफाड), फहीम शेख बशीर (सटाणा), संजय बोडके (नाशिक), भागचंद तेजा (नांदगाव), रघुनाथ आहेर (चांदवड), निवृत्ती धनवटे (निफाड), अशोक निकम (मालेगाव), राजाराम शिंदे (मालेगाव), मनोहर चौधरी (पेठ)

खजिनदार : दिलीप खैरे (नाशिक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -