घरमहाराष्ट्रनाशिकदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून बेटी बचावचा संदेश

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून बेटी बचावचा संदेश

Subscribe

नृत्य, अभिनयाच्या दर्जेदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेट्रो ते मेट्रो गाण्यावर नृत्य सादर करत देशातील विविध संस्कृतीचे दर्शन रसिकांना घडविले. शिवाजी महाराज आणि मॉसाहेब जिजाऊ यांच्यातील प्रसंग, पौरणिक प्रसंग सादर करत विद्यार्थ्यांनी बेटी बचाव संदेश दिला. विद्यार्थ्यांनी दर्जेदार नृत्याविष्कार व अप्रतिम सादरीकरणाने न भूतो, न भविष्यती या प्रमाणे सभागृहातील प्रत्येकाला भावूक केले. दिव्यांग मुला-मुलींच्या नृत्य आणि अभिनयाच्या दर्जेदार आविष्काराने पालकांची मने भारावून गेली. निमित्त होते, मुस्कान सिझन २ जिल्हा आंतरशालेय नृत्यस्पर्धेचे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, दिव्यांग मुले आपल्या समाजातीलच आहेत, या उद्देशाने सक्षम फाऊंडेशनच्या वतीने मुस्कान सिजन-२ दिव्यांग मुलामुलींसाठी नाशिक जिल्हा आंतरशालेय नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झाली. मुस्कान सिझन २ ही स्पर्धा बेटी बचाव, जय जवान, जय किसान या थीमवर सादर करण्यात आली. मुस्कान सिझन-२ मध्ये शारीरिक व मानसिकव्यंग शाळा, अस्तीव्यंग शाळा, अंध शाळा, मुकबधीर व कर्णबधीर शाळा आणि मल्टी डिसअसिलीत शाळा यामध्ये विभागणी करण्यात आली होती. या प्रत्येक विभागातून तीन पारितोषिके देण्यात आली. सहभागी दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम फाउंडेशनतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी समाजकल्याणचे अधिकारी गर्जे, विजय पाटील, डॉ.अजय देवरे, मुख्याध्यापिका कासिस्टर फ्लोरा, डॉ. कांचन देसले, शिक्षण अधिकारी नितीन उपासनी, सक्षमच फाउडेशनचे अध्यक्ष रज्जत शर्मा, राम पवार, गौरव पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

डॉ. सिंगलांकडून कौतुक

मुस्कान सिझन-२ साठी औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंग यांनी व्हिडीओ मेसेजव्दारे स्पर्धेतील दिव्यांग मुलांचे कौतुक करत मनोबल वाढविले. मुस्कान स्पर्धा आयोजित करणार्‍या आयोजक, शिक्षक, पालक व नाशिककर रसिकांचे मन:पुर्वक आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -