जिल्हा रुग्णालयात माथेफिरुने केली तोडफोड

Nashik
a hooligan robbed 20 thousand at chopper point

नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या माथेफिरु रुग्णाने किचन रुममध्ये घुसत टेबलची तोडफोड केल्याची घटना आज (ता.१५) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर धारदार फरशीचा तुकडयाने स्वत:च्या पोट व गळ्यावर वार केले. ही घटना रविवारी (ता.१५) सायंकाळी ७ वाजता घडली.  पंकज मारुती पाटोळे, (30, रा. वडूज, जि. सातारा) असे माथेफिरूचे नाव आहे.

रोजगाराच्या शोधार्थ पंकज पाटोळे पत्नीसह दुचाकीवरुन रविवारी (ता.१५) नाशिकमध्ये आले असता पंकज पाटोळे रस्त्यावर आरडाओरडा करत पळत होता. पतीची मनस्थिती बिघडल्याने पत्नीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परिचारिकाची नजर चुकवून तो किचन रुममध्ये घुसला. त्याने पुरवठा खोलीतील टेबलची तोडफोड केली. टेबलवरील कड्डपा फर्शी जमिनीवर आपटली. फरशीचा धारदार तुकडा उचलून स्वत:च्या पोट व गळ्यावर वार करून घेतले. त्यात तो जखमी झाला. अचानक माथेफिरु रुग्णाने किचनमध्ये तोडफोड केल्याने परिचारिकांसह स्वयपाकी महिला भयभीत झाल्या. त्यांनी त्याला पकडत बांधून ठेवत पोलिसांशी संपर्क साधला. तसेच, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना माहिती दिली.