घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिकेत कमळाची नव्हे २० पासून ‘गुलाब राजा’ची सत्ता

नाशिक महापालिकेत कमळाची नव्हे २० पासून ‘गुलाब राजा’ची सत्ता

Subscribe

पुष्पोत्सवाची दरवळ नागरिकांना अनुभवता येणार; मोसमी आणि बहुवर्षीय हंगामी फुलांचा पसरणार दरवळ

नाशिक महापालिकेत कमळाची अर्थात भाजपची सत्ता असली तरीही येत्या २० फेब्रुवारीपासून गुलाब राजा आणि राणीची सत्ता असेल. निमित्त आहे पुष्पोत्सवाचे. नेहमीच राजकीय घडामोडी आणि तत्सम बाबींनी चर्चेत असलेली पालिका २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान केवळ फुलांच्या दरवळीने बहरलेली असेल. महत्वाचे म्हणजे नाशिककरांना या महोत्सवाचा विनाशुल्क आनंद लुटता येणार आहे.
गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये पुष्पांची संख्या रोडावली आहे. विकासाच्या वाटेवर असलेले शहर सिमेंटच्या जंगलात आपला ‘रोमॅटीक’पणाच हरवत आहे. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षांपासून पुष्पोत्सव भरविण्याची प्रथा महापालिकेत सुरु झाली. यंदा महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्यावतीने येत्या 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव भरवण्यात येणार आहे. शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात हा उत्सव भरेल. यात विविध प्रकारची गुलाब पुष्पे ठेवण्यात येणार आहेत. गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार,गुलाब राजकुमारी ही मानांकनाची बक्षिसे पुष्पोत्सवात देण्यात येतील. या पुष्पोत्सवात विविध गटातील स्पर्धेत पुष्पप्रेमी नागरिकांनी, शालेय विद्यार्थी मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा. तसेच या पुष्पोत्सवास सर्व पुष्पप्रेमी नागरिकांनी सहभाग व भेट दयावी असे आवाहन महापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समिती सभापती, विरोधी पक्ष नेते, सर्व गटनेते व सर्व वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी राजीव गांधी भवन येथील मनपाच्या उद्यान विभागाशी संपर्क साधावा.

जपानी पुष्परचना अन् बरच काही

गेल्या वर्षीच्या पुष्पोत्सवातील दृश्य

मोसमी व बहुवर्षीय हंगामी फुले यामध्ये फलॉक्स, स्टर, झेंडु, कॅलेन्डुला, न्टीर्‍हीम्, पिटुनिआ, जरबेरा, शेवंती, डेलीया, निशीगंध, कारनेशन आदी.फुलांसाठी फुलराणी पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच जपानी पुष्परचना, इकेबाना, पुष्प रांगोळी, हार, बुके इ.साठी ट्रॉफीज दिल्या जाणार आहे. तसेच मिनीएअचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे.

- Advertisement -

४८ गटात होणार स्पर्धा

गेल्या वर्षीच्या पुष्पोत्सवातील दृश्य

पुष्पोत्सवात एकूण 48 गट असतील. प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात आली असून महत्वाची बक्षिसे नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समुह यांच्याकडुन पुरस्कृत आहेत. २० फेब्रुवारीला उत्सवाचेे उद्घाटन होईल. 21 ते 23 फेब्रुवारीला पुष्पप्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहील. कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक व गीतगायन आदी कार्यक्रम आयेाजित करण्यात येणार आहे.

बेलाच्या रोपांचे वाटप

या आयोजनाच्या दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने बेल महोत्सवाचे ही आयोजन करण्यात येणार असुन या काळात बेल वृक्षाचे रोपांचे वाटप व लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

स्टॉल्स उपलब्ध

गेल्या वर्षीच्या पुष्पोत्सवातील दृश्य

पुष्पमहोत्सवाच्या प्रांगणात नर्सरीचालक तसेच बाग-बगीचा साहित्याशी संबंधीत व्यावसायीकांसाठी नाममात्र दराने स्टॉल उपलब्ध आहेत. स्टॉलचे बुकींग सुरु असून ज्यांना स्टॉल हवे असतील त्यांनी तत्काळ स्टॉल्सचे आरक्षण करावे.

गेल्या वर्षीच्या पुष्पोत्सवातील दृश्य

 

नाशिक महापालिकेत कमळाची नव्हे २० पासून ‘गुलाब राजा’ची सत्ता
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -