घरमहाराष्ट्रनाशिकदेवळालीत पिता-पुत्रांना राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

देवळालीत पिता-पुत्रांना राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

Subscribe

देवळाली विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून एकदाही पराभूत न झालेले शिवसेनेचे पारंपारिक उमेदवार योगेश घोलप यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे कडवे आव्हान उभे राहिले आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून एकदाही पराभूत न झालेले शिवसेनेचे पारंपारिक उमेदवार योगेश घोलप यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. महापालिका निवडणुकीत घोलप यांच्या कन्येला पराभूत करुन निवडणुकीचा ट्रेलर दाखवणार्‍या सरोज अहिरे यांचे हे आव्हान असून, त्यांना माजी आमदाराची कन्या म्हणूनही वाढती सहानुभूती मिळते आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली या राखीव मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला आपले वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबियांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबियांसाठी यंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत घोलपांची कन्या तनुजा यांना पराभूत करुन राजकीय महत्व निर्माण करणार्‍या सरोज आहिरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. घोलप कुटुंबियांच्या विरोधात लढण्याची त्यांनी दाखवलेली जिद्द वाखाणण्यायोग्य ठरल्याने यंदाची निवडणूक घोलपांना गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. मतविभागणीच्या फायद्यावर आमदारकी गाजवणारे घोलप नेहमी विरोधीपक्षांच्या राजकीय चालींवर स्वार झाले आहेत. त्यादृष्टीने खेळलेली चाल यशस्वी करुन दाखवण्यात त्यांना काही अंशी यश आल्याचे दिसून आले. मात्र, इतके वर्ष सत्ता देवूनही मतदारसंघात महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांना यश आलेले नाही.

- Advertisement -

नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) व एकलहरे प्रकल्पाचा प्रलंबित प्रश्न आजही स्थानिकांना सतोवतो आहे. बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यात त्यांना सपशेल अपयश आले आहे. ग्रामीण भागातील तीस वर्षांपासून शाश्वत विकासाची प्रतिक्षा अद्याप संपलेली नाही. पर्यटनाला अनुकूल असा हा मतदारसंघ असताना दूरदृष्टीकोनाच्या अभावी एकही प्रकल्प संघात उभारु शकले नाहीत. अशीच परिस्थिती शिक्षण व उद्योग धंद्याच्या बाबतीत दिसून येते. व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा मुद्दा आता मतदारांना कंटाळवाणा वाटू लागला आहे. सर्वच पातळ्यांवर घोलप कुटुंब पिछाडीवर पडल्यामुळे निवडणुकीत त्यांच्यापुढे आव्हानांचा डोगर उभा ठाकला आहे. त्याचा सामना करताना उमेदवाराची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते.

मतविभागणी अशक्य

देवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला मिळाला आहे. यंदा केवळ चारच अपक्ष आहेत तर वंचितच्या प्रभावाची चर्चा नसल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे. घोलप यांच्याविरोधात यापूर्वी उमेदवारी करणारे नेते तेच ते चेहरे पक्ष बदलून उभे राहिले, त्याचा लाभ घोलप यांनाच होत गेला. अनुसूचित जातीसाठी राखीव असा हा मतदारसंघ असताना समाजाच्या राजकारणामुळे अन्य उमेदवारांना अपेक्षित मते मिळत नाहीत. यंदा सरोज अहिरे या घोलप यांची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पिंगळेंनी केला कारखाना बंद

देवळाली या मतदारसंघात शक्य व अशक्य वाटणार्‍या सर्व गोष्टी साध्य केल्या. नाशिक साखर कारखाना व आमदारांचा काहीच संबंध येत नाही. माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी हा कारखाना बंद केला असून, उलट तेच बोंबा मारत आहेत. मग कारखाना बंद का पाडला? याचे उत्तर त्यांनीच द्यावे. – बबन घोलप, माजी मंत्री, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -