घरमहाराष्ट्रनाशिकशिक्षण हक्क कायद्यांतर्गत मराठासह खुल्या प्रवर्गाला प्रवेश, फेब्रुवारीपासून प्रक्रिया

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मराठासह खुल्या प्रवर्गाला प्रवेश, फेब्रुवारीपासून प्रक्रिया

Subscribe

फेब्रुवारीपासून प्रवेशप्रक्रिया होणार सुरू; जिल्ह्यात ६,५८९ जागा

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीइ) आर्थिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नर्सरी व पहिलीसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. त्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून, मराठा समाजाला १६ टक्के व केंद्र शासनाने खुल्या प्रवर्गाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ प्रवेशावेळी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासंदर्भात शासनाने आदेश काढल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्ह्यातील ४६६ अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये ६५८९ जागांसाठी आरटीइ अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ ते २०२० याकरिता येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. मागील वर्षी साडेसहा हजार जागांसाठी ११ हजारांवर अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांतून चार प्रवेश फेर्‍यांद्वारे ७ हजार १०८ बालकांची निवड झाली होती. यंदा सुरू होणार्‍या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला व खुल्या प्रवर्गातील १० टक्के आरक्षणाचा लाभ दिल्यास सर्वच गटांमध्ये काट्याची स्पर्धा होऊ शकते.

- Advertisement -

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

सर्व विद्यार्थ्यांना रहिवाशी पुरावा व जन्मदाखला आवश्यक आहे. एस.सी., एस.टी., व्ही.जे.एन.टी., ओ.बी. सी, इ.एस.बी.सी. या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना एक लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला व दिव्यांग विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा दाखला आवश्यक आहे. पहिली व नर्सरीसाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत नर्सरीसाठी ३ वर्षे पूर्ण आणि पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -