घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये समीर भुजबळ; दिंडोरीत महालेंना उमेदवारी?

नाशिकमध्ये समीर भुजबळ; दिंडोरीत महालेंना उमेदवारी?

Subscribe

राज्यातील आघाडीचे प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने अंतर्गत वादावर पडदा टाकत लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांच्या हातात हात घातल्यामुळे बहुतेक जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. राष्ट्रवादीने अनेक दिवस झुलत ठेवलेली येथील उमेदवारी आता दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना दिल्याचे मानले जाते. तसेच नाशिकमध्ये समीर भुजबळ यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

राज्यातील आघाडीचे प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने अंतर्गत वादावर पडदा टाकत लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांच्या हातात हात घातल्यामुळे बहुतेक जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. राष्ट्रवादीने अनेक दिवस झुलत ठेवलेली येथील उमेदवारी आता दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना दिल्याचे मानले जाते. तसेच, नाशिकमध्ये समीर भुजबळ यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

आघाडीचे प्रमुख शिलेदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकत येथील लोकसभेच्या वातावरणाचा अंदाज घेतला. पवारांनी दोन दिवसांत पक्षातील व पक्षाबाहेरील व्यक्तींची भेट घेतली. दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी चांदवड येथे जाहीर सभा घेत तेथील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात धनराज महाले यांच्या उमेदवारीचे पारडे जड झाले असून डॉ.भारती पवार यांनाही व्यासपीठावरून उमेदवारीची जाहीर मागणी केल्याने त्यांचीही निष्ठा पणास लागलेली दिसली. गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतर डॉ.पवार यांनी पाच वर्षांत विविध मुद्यांवरून भाजप सरकारविरोधात रान उठवले. त्यांनी हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविरोधात वातावरण निर्मिती केली. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी माजी आमदार धनराज महाले यांना पक्षात आणून उमेदवारीचा शब्द दिला. शरद पवारांच्या दौर्‍यानंतर आता त्यांच्या उमेदवारीचा मार्ग अधिक सुकर झाला असून, भारती पवार यांच्यापुढे मात्र अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. भाजपने त्यांना गळाला लावण्याचे अनेकदा प्रयत्न करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पवार भाजपमध्ये जाणार का, याबाबत अटकळी बांधल्या जात आहेत.

- Advertisement -

नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भुजबळ कुटुंबियांमध्ये दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र, छगन भुजबळ की समीर याचे कोडे अद्याप उलगडलेले नव्हते. त्यामुळे पवारांच्या दौर्‍याला या दृष्टीने कमालीचे महत्व प्राप्त झाले होते. त्यांच्या गाडीचे सारथ्य करून समीर भुजबळ यांनी उमेदवारीचे संकेत पहिल्याच दिवशी दिले. दुसर्‍या दिवशी छगन भुजबळ यांनी भाषणात ‘समीर यांचे कौतुक केले. यामुळे समी भुजबळांनाच नाशिकमधून उमेदवारी दिल्याचे मानले जात आहे. निवडणुकीत आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल हे कळण्यासाठी पुरेसे आहे, असेच म्हणावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -