घरमहाराष्ट्रनाशिकअवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विभागाला ५७३ कोटी रूपये मंजूर

अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विभागाला ५७३ कोटी रूपये मंजूर

Subscribe

मदतनिधीतून कर्ज वसुली न करण्याचे आदेश

राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महीन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती त्यानूसार राज्यपालांनी सर्व विभागांचा आढावा घेत बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासंदर्भात मदत जाहीर केली. शासनाने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली असून २ हजार ५९ कोटी रूपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. यात नाशिक विभागाकरीता ५७३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे.

अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका

‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे जिल्हयात शेतकरयांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्हयात मका, कांदा, द्राक्ष, बाजरी, सोयाबीन आदि पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासाठी शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. अनेक नेत्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासाठी शासन दरबारी आपले प्रश्न मांडण्याचे आश्वासनही दिले. मात्र राज्यातील एकूणच राजकीय स्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे नविन सरकार येईपर्यंत शेतकर्‍यांना प्रतिक्षा करावी लागणार अशी चिंता व्यक्त केली गेली. मात्र राज्यपालांनी प्रत्येक विभागाच्या नुकसानीचा आढावा घेत शेतीपिकांसाठी ८ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रूपयं प्रती हेक्टरी मदत जाहीर केली. नाशिक विभागात २३ लाख ८० हजार ९२३ इतक्या शेतकर्‍यांच्या २१ लाख ५९ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केहून जास्त प्रमाणात नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे.

मदत वाटपासंदर्भातले कोणतेही आदेश अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. शासनाच्या निकषानूसार जिल्हयाला अपेक्षित निधीचे मुल्यांकन करण्यात येत आहे. निधी प्राप्त होताच तो शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. याकरीता पीएम किसानचा डेटा प्रशासनाकडे उपलब्ध असून शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisement -

या अहवालानूसार एनडीआरएफच्या निकषानूसार नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जिल्हयासाठी पहील्या टप्प्यात ५७३ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत अनुज्ञेय राहणार आहे. मदत देतांना ती शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. तसेच मदत देतांना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. मात्र शासनाकडून प्राप्त मदत ही नकसानीच्या तुलनेत तोकडी असून याबाबत शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

असे आहे नुकसान

  • नंदुरबार जिल्ह्यातील १०,८३५ शेतकर्‍यांचे ५,७८६.९७ हेक्टर जिरायत, ३८ शेतकर्‍यांचे २२.८७ हेक्टर बागायती आणि १२ शेतकर्‍यांचे ९.०६ हेक्टर फळपिकांखालील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.
  • जळगाव जिल्ह्यातील ४,२८,५२९ शेतकर्‍यांचे ४,६६,५१८.४६ हेक्टर जिरायत, २,०२,३४२ शेतकर्‍यांचे २,२७,९३६.६५ हेक्टर बागायती आणि १०,४७४ शेतकर्‍यांचे १०,३८७.८९ हेक्टर फळपिकांखालील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.
  • नगर जिल्ह्यातील ६,३४,०३३ शेतकर्‍यांचे २,१६,५८७.७० हेक्टर जिरायत, ६,३४,०३३ शेतकर्‍यांचे २,२१,१९८.६१ हेक्टर बागायती आणि ६,३४,०३३ शेतकर्‍यांचे १६,२२६.७७ हेक्टर फळपिकांखालील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.

जिल्हानिहाय मंजूर निधी

  • नाशिक १८१ कोटी ५० लाख ८४ हजार
  • धुळे ७४ हजार ८७ कोटी २२ हजार
  • नंदुरबार १ कोटी १३ लाख ७६ हजार
  • जळगांव १७९ कोटी ९८ हजार १ हजार
  • नगर १३५ कोटी ५५ लाख ९ हजार

नाशिक जिल्हयात अवकाळी पावसामुळे ६३६ कोटींचे नुकसान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -