घरमहाराष्ट्रनाशिककौलाणे गर्भपात प्रकरण : आरोग्य विभागाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात

कौलाणे गर्भपात प्रकरण : आरोग्य विभागाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात

Subscribe

मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील अवैध गर्भपात प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, डीएनए चाचणीसाठी घेतलेले अर्भकाचे नमुने आरोग्य विभागाने चुकीच्या रसायनात पाठवल्याने ते नष्ट झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर, धुळे येथे हे नमुने पाठवण्यातही आरोग्य विभागाने विलंब केल्याने या विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील अवैध गर्भपात प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, डीएनए चाचणीसाठी घेतलेले अर्भकाचे नमुने आरोग्य विभागाने चुकीच्या रसायनात पाठवल्याने ते नष्ट झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर, धुळे येथे हे नमुने पाठवण्यातही आरोग्य विभागाने विलंब केल्याने या विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गुरूवारी तहसीलदार ज्योती देवरे व तपास अधिकारी दीपक ढोके यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह श्रीरामनगर स्मशानभूमीत पुरलेले ते अर्भक पुन्हा उकरून नव्याने नमुने घेतले. यावेळी हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे अवैध गर्भपात प्रकरणी आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा समोर आला आहे. पुणे येथून आलेल्या एका प्रेमी युगलाने २१ जानेवारीला तालुक्यातील कौळाणे येथे अवैधरित्या गर्भपात करून ते अर्भक मनमाड चौफुली परिसरात पुरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या अवैध प्रकरणाचे बिंग फुटले होते. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेवर या घटनेचा तापसाचा दबाव वाढल्याने या प्रकरणी डॉक्टरसह सहा आरोपींना अटक केली होती. दरम्यान, या अवैध गर्भपात प्रकरणाला गुरुवारी पुरलेले अर्भक नव्याने बाहेर काढण्यात आल्याने नवीन वळण लागले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी तपासअधिकारी यांना आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी तहसीलदार यांच्या समक्ष अर्भकाचे नव्याने नमुने घेण्याबाबत पत्र दिले होते. तसेच तपासअधिकारी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना याविषयी पत्र लिहून परवानगी मागितली होती. अखेर यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत तीव्र अभिप्राय नोंदवत अर्भकाचे नव्याने नमुने घेण्यास परवानगी दिली. तसेच याविषयी लेखी खुलासा देखील आरोग्य विभागाकडे मागितला आहे. गुरूवारी श्रीरामनगर स्मशानभूमीत तहसीलदार ज्योती देवरे, तपासअधिकारी दीपक ढोके यांच्यासह पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने ते अर्भक पुन्हा उकरून काढण्यात येऊन नव्याने नमुने घेऊन ते नाशिक येथे चाचणीसाठी पाठवणार आहेत. या घटनाक्रमाने एकूणच या प्रकरणातील तपास यंत्रणा व आरोग्य विभागाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -