स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस उलटली; १० प्रवासी जखमी

Nashik

स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना आंबेगण ते चाचपडगाव दरम्यान सोमवारी (दि.१७) सकाळी घडली. अपघातात १० प्रवासी जखमी झाले असून बसचे नुकसान झाले आहे.

पेठ आगारची बस (एमएच ०७-सी-९५१५) सोमवारी (दि.१७) सकाळी पेठहून दिंडोरीकडे जात होती. आंबेगण ते चाचडगाव प्रवासादरम्यान अचानक बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमधील प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात करताच रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनचालकांनी मदतसाठी धाव घेतली. वाहनचालकांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत उपचारासाठी उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

जखमींची नावे
गोविंद रावजी बोरसे (सर्वजण रा.पेठ), चंद्रशेखर अरुण पठाडे, कामील खुरशेद, भूरा नवाब, हिरामण सखाराम कोतवाल (सर्वजण रा.आंबेगण), सूरज राजेंद्र गायकवाड, देविदास विठ्ठल कोतवाल, चंद्रकांत देविदास कोतवाल, कृष्णा इंपाळ (रा.तोंडवळ), रामनाथ सिताराम गायकवाड (रा.गोळशी) अशी जखमींची नावे आहेत.