घरमहाराष्ट्रनाशिकश्रीरामपूरनजीक भीषण अपघात; नाशिक जिल्ह्यातील दोन महिला ठार, चार जखमी

श्रीरामपूरनजीक भीषण अपघात; नाशिक जिल्ह्यातील दोन महिला ठार, चार जखमी

Subscribe

बाभळेश्वर-श्रीरामपूर रस्त्यावर दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन महिला जागीच ठार झाल्या, तर चार जण जखमी झाले. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

निफाड तालुक्यातील सायखेडा येथील प्रतिक्षा राजेश मालपाणी (वय २६) आणि इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील अंकिता सतीश मुंदडा (वय २२) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. या अपघातात सायखेडा येथील राजेश संतोष मालपाणी, कवडदरा येथील अक्षय सतिश मुंदडा व संजना सतीश मुंदडा हे तिघे जखमी झाले. राहता येथील वाहनचालक संतोष सोपान गट हा किरकोळ जखमी झाला.

मालपाणी कुटूंबीय बाभळेश्वरकडून श्रीरामपूर मार्गे देवगड येथे फोर्ड फिएस्टा कारने दर्शनासाठी जात असताना, ममदापूर शिवारात श्रीरामपूरकडून बाभळेश्वरच्या दिशेने निघालेल्या झायलो कारची त्यांच्या गाडीची भीषण धडक झाली. त्यात दोन महिला जागीच ठार झाल्या. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने मृत व जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघातात मृत प्रतिक्षा मालपाणी हिचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -