रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजप प्रवेशाची घोषणा

राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठा धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जुनेजाणते नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

Maharashtra
रणजितसिंग मोहिते पाटील

राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठा धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जुनेजाणते नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रणजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याने भाजपात प्रवेश करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला असून आज, मंगळवारी रणजितदादांनी अकलूज येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपप्रवेशाची घोषणा केली. उद्या, बुधवारी दुपारी १२.३० वाजता रणजितसिंह मोहिते पाटील मुंबईतील वानखेडे स्टेडिअम येथील गरवारे जिमखान्याजवळील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.

विजयसिंह मोहिते पाटलांचा पाठिंबा 

गेल्या कित्येक दिवसांपासून लोकसभेतील माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून रणजितसिंह यांची नाराजी समोर येत होती. त्याबाबत ठोस निर्णय जाणून घेण्याकरता आज, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या बंगल्याबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. या कार्यकर्त्यांना संबोधित करताना रणजितदादा यांनी भाजप प्रवेशची घोषणा केली. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनीदेखील त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे गुणगाण केले. आपण विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठीच भाजप प्रवेश करत असल्याचेही स्पष्टीकरण रणजितदादा यांनी यावेळी दिले.

letter

कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला

राष्ट्रवादीवर नाराज आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेल्या मोहिते पाटील गटाची महत्वाची बैठक अकलूज येथील शिवरत्न बंगल्याच्या आवारात झाली. या बैठकीला हजारो कार्यर्त्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीला खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह करमाळाचे शिवसेना आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, माळशिरस तालुक्यातील सर्व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील, सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो समर्थक उपस्थित आहेत.

सुजयनंतर रणजितदादा भाजपात 

यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी नगर मतदारसंघावरून नाराजी दर्शवत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता रणजितसिंह मोहिते पाटीलदेखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे जागा वाटपावरील मुद्द्यावरून पक्ष अदलाबदलीचे वारे राज्यात वाहत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here