घरमहाराष्ट्रतात्काळ कामावर रूजू होण्याचे शिक्षकांना आदेश

तात्काळ कामावर रूजू होण्याचे शिक्षकांना आदेश

Subscribe

ऑनलाईन, ऑफलाईन व दुरस्थ शिक्षणाशी संबंधित कामांसाठी शिक्षणांना शाळेत हजर राहण्याचे आदेश सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत.

शाळांमधील ५० टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी तात्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. ऑनलाईन, ऑफलाईन व दुरस्थ शिक्षणाशी संबंधित कामांसाठी शिक्षणांना शाळेत हजर राहण्याचे आदेश सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यात कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आता शाळांमध्येही ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दुरस्थ शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, दुरस्थ, टेलि कौन्सिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विना अनुदानित या सर्व शाळांंमधील ५० टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऑनलाईन, ऑफलाईन, दुरस्थ शिक्षणाशी संबंधित कामाकाजासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे, असे आदेश सरकारने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -