बायकोला दारूचं व्यसन, नवऱ्याची आत्महत्या!

Pimpari-Chinchwad
man commits suicide due to wifes torture
पत्नीच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. पत्नीकडून मिळणारी अमानुष वागणुक, सतत होणारा अपमान, मारहाण आणि मित्रमंडळींमध्ये होणारी बदनामी या सगळ्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. पिंपरीच्या चिखली येथे हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

अशी घडली घटना

चिखली येथे राहणाऱ्या २५ वर्षाच्या जय तेलवाणी यांचा एका वर्षापूर्वी २१ वर्षाच्या तृप्तीशी विवाह झाला होता. १३ नोव्हेंबरला जयने आत्महत्या केली होती. याप्रकरणी जयची आई कांचन तेलवाणी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तृप्ती जयचा छळ करायची यालाच कंटाळून जयने आत्महत्या केली असल्याचा आरोप कांचन यांनी केला होता. तृप्ती वारंवार पैशांची मागणी करायची. पैसे न दिल्याने जयला शिवीगाळ करायची. तसंच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायची. ऐवढेच नाही तर जयला कॅन्सर झाला आहे. असा एक टिकटॅक व्हिडिओ तयार करुन तो जयच्या मित्रांना दाखवून जयची बदनामी करत. या सगळ्याला कंटाळून अखेर जयने आपले जीवन संपवले.

आरोपी पत्नीला अटक

जयच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पंधरा दिवस संपूर्ण प्रकरणासंबंधी जयच्या मित्रांची, कुटुंबियांची चौकशी करून अखेर जयची पत्नी तृप्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिला अटक केली. तृप्ती जयसोबत असं का करायची याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

हेही वाचा – 

भाचीच्या विनयभंगानंतर मामाची आत्महत्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here