घरमहाराष्ट्रबापरे! ग्रॅज्युएट सोनसाखळी चोराकडून ८ लाखांचे दागिने हस्तगत!

बापरे! ग्रॅज्युएट सोनसाखळी चोराकडून ८ लाखांचे दागिने हस्तगत!

Subscribe

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे.

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या एका पदवीधर सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. समीर श्रीकांत नान्नजकर वय-४६ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून ८ लाख ४८ हजार रुपयांचे २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्यातील १० गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांपासून लपण्यासाठी आरोपी श्रीकांतने स्वतः चे नाव बदलून विनायक श्रीकांत नान्नजकर असे ठेवले होते. तसेच बनावट आधार कार्ड देखील तयार केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हा गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतो आहे. तो पदवीधर झाला असून अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावत असे. त्याच्यावर आर्म अॅक्ट आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की आरोपी श्रीकांत हा भोसरी येथे आहे. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाठलाग करून त्याला फिल्मीस्टाईल पद्धतीने पकडले.

- Advertisement -

श्रीकांतला न्यायलयात हजर करून आज रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. एका साथीदारासह दुचाकीवरून येऊन पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असे, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, हिसकावलेले काही सोन्याचे दागिने ओळखीच्या सोनाराला आई आजारी असल्याचा बहाणा करून विकले, तर काही गहाण ठेवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -