घरमहाराष्ट्रप्रकाश मेहता आऊट; राधाकृष्ण विखे पाटील इन?

प्रकाश मेहता आऊट; राधाकृष्ण विखे पाटील इन?

Subscribe

प्रकाश मेहतांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्य मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपप्रवेश देऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा सुरू आहेत. आता त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना कोणतं खातं मिळणार, यावरही शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. एमपी मिल कम्पाऊंड प्रकरणात दोषी आढळलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी नारळ देऊन त्यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची जोरदार तयारी सरकारमध्ये सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. येत्या १० तारखेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश जाहीर करण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.

हे पाहा – अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस लूक

९ जूनच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब?

दरम्यान, ९ जूनला दिल्लीमध्ये भाजपाची महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि दुष्काळ यावर चर्चा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे ९ जूनच्या बैठकीत निर्णय होऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यानंतर प्रवेश देऊन त्यांना संभाव्य नव्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

‘यांना’ मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार स्थान

संभाव्य मंत्रिडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषीमंत्री, शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट, तर मदन येरावार यांनाही कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळू शकते. आघाडी सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील हे कृषीमंत्री होते. त्यांचा अनुभव पाहता आणि फुंडकर यांच्या निधनाने सध्या कृषी खात्याचा अतिरिक्त भार चंद्रकांत पाटील यांच्याकडे असल्याने हा भार कमी करण्यासाठी विखेंना कृषी खाते मिळण्याची शक्यता आहे.


प्रकाश मेहतांचा वेगळाच दावा! – मला दोषी ठरवण्यात आलेलं नाही

म्हणून प्रकाश मेहतांना मिळणार डच्चू?

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर एम पी मिल कम्पाऊंड प्रकरणामुळे विरोधक भाजपा विरोधात रान उठवतील. तसेच निवडणुकीपूर्वी महत्त्वपूर्ण अशा पावसाळी अधिवेशनात देखील विरोधक प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करतील. त्यामुळे येत्या निवडणुका लक्षात घेता प्रकाश मेहता यांना मंत्रिपदावरून हटवले जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, एमपी मिल कम्पाऊंड प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी दिलेला अहवाल राज्य सरकारला मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल विधानसभेत मांडला जाईल, असे देखील सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -