घरमहाराष्ट्रलोणावळ्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

लोणावळ्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

Subscribe

लोणावळ्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या आहेत. घोषणाबाजी करणाऱ्या इसमाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणारा कार्यक्रम लोणावळ्याच्या शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पाकिस्तान जिंदाबाद!’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात मोठा गोेंधळ झाला. पोलिसांनी या इसमाला ताबोडतोब ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. कुमार उपेंद्र बीरबहादुर सिंग असं या घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा या भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या विरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. असाच एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम लोणावळा येथे आयोजित करण्यात आला होता.

घोषणाबाजी देणारा माथेफिरु

शोकाकूळ वातावरणात पाकिस्तान जिंदाबादचे नारा देणारा इसम हा माथेफिरु असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो लोणावळा स्टेशन येथे ज्युनियर टी.सी.ची नोकरी करतो. तो ३९ वर्षाचा आहे. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या उपेद्र कुमारला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या १५३ – ब अन्वये देशद्रोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा उपेंद्र कुमार ऐरवी वेड्यासारखंचं वागतो, अशी माहिकी मिळाली आहे. तो रेल्वे प्लॉटफॉर्मवर वेड्यासारखी गाणी गातो, विनोद सांगतो, प्रवाशांशी मोठ्याने असंबध बोलतो, त्यामुळे तो माथेफिरु आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उपेंद्र कुमारला पोलीस स्टेशनमध्ये आणले, तेव्हा पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी ही सर्व गर्दी घालवून दिली आहे. यासोबतच पोलिसांनी उपेंद्र कुमार याच्या घरीदेखील बंदोबस्त ठेवला आहे.

उपेंद्र कुमार याच्या कृत्याबद्दल मुंबईचे सिनीयर डीसीएम पनवर साहेब यांना माहिती दिली असता, त्यांनी त्यांचा आदेश क्रमांक २/५३ अन्वये पुढील आदेशापर्यंत त्याला निलंबीत केले आहे.
– पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -