घरमहाराष्ट्रसोलापुरात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

सोलापुरात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

Subscribe

सोलापुरात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळींबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते. या अवकाळी पावसामुळे खुप मोठं नुकसान झाल्यामुळे शासनाने पंचनामा करुन किमान नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

वीज कोसळ्याने दोन जनावरांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी पाऊस आणि गारपीटीने गावाला झोडपून काढले आहे. दरम्यान, वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी दोन ते चारच्यादरम्यान सांगोला तालुक्यातील खवासपूर, लोटेवाडी परिसरात गारपीट झाली. या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळींब आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -