घरताज्या घडामोडी'आज बाळासाहेब हवे होते', राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

‘आज बाळासाहेब हवे होते’, राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Subscribe

अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचे भूमिपूजन उद्या ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. देशभरात उद्या उत्साह सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्व. बाळासाहेबांची आठवण काढली आहे. “या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता.”, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी फेसबुकवर टाकली आहे.

जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त…

Posted by Raj Thackeray on Tuesday, August 4, 2020

- Advertisement -

 

राज ठाकरे म्हणाले की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.”

- Advertisement -

बाळासाहेबांना मनापासून आनंद झाला असता

“तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -