घरमहाराष्ट्रसातवा वेतनासाठी विद्यापीठ कर्मचारी आक्रमक

सातवा वेतनासाठी विद्यापीठ कर्मचारी आक्रमक

Subscribe

जुलैमध्ये बेमुदत संपाचा इशारा

महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत संरचना लागू करणे आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनासंदभार्तील मागणीसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सर्व कुलगुरुंना निवेदन सादर करण्यात आले आहे.

महराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्यावतीने पुणे येथील विद्यापीठात बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करुन विविध निर्णय घेण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत संरचना आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत रद्द करण्यात आलेला शासन निर्णय पूर्ववत करण्यात यावे या मागणीवर चर्चा झाली. त्यानुसार आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली. १ ते १२ जूनला शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी काळी फित बांधुन कामे करतील. १३ जूनपासून सर्व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर दुपारच्या जेवणाच्या वेळेत निदर्शने करतील. १३ जूनला विभागीय उपसंचालक उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील. २५ जूनला उच्च शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २९ जूनला एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार. त्याचप्रमाणे जुलैमध्ये कोणत्याही दिवसापासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -