घरमहाराष्ट्रभुजबळांच्या घरवापसीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेणार - जोशी

भुजबळांच्या घरवापसीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेणार – जोशी

Subscribe

“छगन भुजबळ हा काम करणारा माणूस आहे. शिवसेनेत त्यांना घ्यायचे किंवा नाही याचा निर्णय पक्ष घेईल. पक्षाचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असेल” अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जोशी यांच्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली यानिमित्ताने एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना जोशी यांनी भुजबळ आणि उन्मेष जोशी यांच्या ईडी चौकशीबद्दल भाष्य केले.

बाप्पा आमच्यावरील ईडीचं विघ्न नक्की दूर करेल

गणपती बाप्पा स्वछ्च असलेल्या लोकांचे विघ्न दूर करतो, माझ्या मुलावर आलेले ईडीचे विघ्नही बाप्पा दूर करेल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे. उन्मेष जोशी यांची कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात दोनदा ईडीने चौकशी केलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -