घरमहाराष्ट्रबुलडाण्याचे नाव राजमाता जिजाऊनगर करा - मेटे

बुलडाण्याचे नाव राजमाता जिजाऊनगर करा – मेटे

Subscribe

राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला आहे. त्यामुळे बुलडाण्याची ओळख त्यांच्या नावानेच व्हावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे

बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून त्याचे नाव राजमाता जिजाऊनगर ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. जर बुलडाण्याचे नाव राजमाता जिजाऊनगर केले नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मेटे यांनी दिला आहे. जालना येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.

नाव बदलले नाही तर आंदोलन करु

येत्या १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर असे ठेवावे अशी मागणी मेटे यांनी केली आहे. जर १२ जानेवारीला नाव बदलले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मेटे यांनी दिला आहे. जालन्यामध्ये तो बोलत होते. दरम्यान, मंत्रीपद न दिल्यामुळे नाराज असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला आहे. त्यामुळे बुलडाण्याची ओळख त्यांच्या नावानेच व्हावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. मंत्रीपदाची वेळोवेळी मागणी करून देखील सरकारने दुर्लक्ष केल्याने सरकार विरोधात आपण नाराज असल्याचे मेटे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – 

रात्रीच्या अंधारत विनायक मेटेंनी उरकलं शिवस्मारकाचं भूमिपूजन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -