घरमहाराष्ट्रकोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांच्या पार

कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांच्या पार

Subscribe

राज्यात २३,३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११,२१,२२१ झाली आहे. राज्यात २,९७,१२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४७४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३०,८८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ टक्के एवढा आहे.

राज्यात ४७४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५०, ठाणे १३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २, मीरा भाईंदर मनपा ३, वसई विरार मनपा ८, रायगड २७, नाशिक २०, अहमदनगर ३६, जळगाव ८, पुणे ३९, पिंपरी चिंचवड मनपा ९, सोलापूर १४, सातारा ३८, कोल्हापूर १९, सांगली ३१, औरंगाबाद ७, लातूर १४, उस्मानाबाद ८, नांदेड ६, अमरावती ११, नागपूर ३९ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ४७४ मृत्यूंपैकी ३३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३७ मृत्यू नागपूर ९, अहमदनगर ७, औरंगाबाद ३, कोल्हापूर २, पुणे २, रायगड २, सांगली २, ठाणे २, बीड १, जळगाव १, नाशिक १, उस्मानाबाद १, पालघर १, वर्धा १, यवतमाळ १ आणि रत्नागिरी १ असे आहेत.

- Advertisement -

आज १७,५५९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७,९२,८३२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५५,०६,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,२१,२२१ (२०.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,५३,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -