घरमहाराष्ट्रस्वप्न पुर्ण करण्यासाठी तीस वर्षीय तरूण झाला ८१ वर्षाचा वृद्ध

स्वप्न पुर्ण करण्यासाठी तीस वर्षीय तरूण झाला ८१ वर्षाचा वृद्ध

Subscribe

हव्यासापोटी तरूणाचे फुटले भांडे

लहानपणापासूनच आपण स्वप्न बघाण्यास सुरूवात करतो. मात्र ती सत्यात साकारताने कठीण परिश्रम करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. मात्र अहमदाबाद येथील एका पठ्ठ्याने शक्कल लढवून आपले स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या तीस वर्षाीय तरूणाला अमेरिकेला जायचे होते. त्याचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अहमदाबाद येथे राहणाऱ्या जयेश पटेलने शक्कल लढवली. मेकअप करून स्वतःचे रूप बदलवत हा ३० वर्षाचा तरूण ८१ वर्षाचा वयोवृद्ध बनला. याकरिता त्याने डोक्यावरील केस पांढरे करत जाड भिंगाचा चष्मा लावला. अमेरिकेला जाण्यासाठी खोटा पासपोर्ट तयार देखील बनवून घेतला. मात्र, ज्यावेळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअऱपोर्टवर त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी या तरूणाने भांडे फुटले आणि त्याचे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न भंगले.

- Advertisement -

अशी केली होती अमेरिकेला जाण्याची तयारी…

आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी या तरूणाने ४ महिन्यांपासून तयारी केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय एअऱपोर्टवर त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांचा हा तरूण खोटा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला या अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलीसांच्या हवाली केले. यापुर्वी पासपोर्ट आणि इतर तपासणीस त्याकडील कागदपत्र बनावट असल्याचे लक्षात आले होते.

वयोवृद्ध असल्याशिवाय आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही असे वाटत असल्याने इलेक्ट्रिशियन असलेल्या जयेश पटेल या तरूणाने अमरिक सिंह हे नाव घेऊन आपला खोटा पासपोर्ट तयार करून घेतला. त्याच्या शेजारी राहणारी महिला अमेरिकेत नोकरी करत होती आणि ती उत्तम पैसा कमवत होती. याला देखील जास्त पैसे कमवायचे होते… या हव्यासा पायी त्याने हा सर्व प्रकार केला.

- Advertisement -

एजंटच्या मदतीने तरूण बनला युवक

व्हिसा काढण्यासाठी भेटलेल्या एजंटने जयेशला मेकअप आर्टिस्टकडे पाठविले. त्याने या तरूणाला उभेउभ वयोवृद्ध बनवले. याशिवाय या एजंटने वृद्धाचे सोंग घेतल्यानंतर व्हिलचेअरने जा असा देखील सल्ला दिला होता. पण बनावट कागदपत्र आणि नीट न झालेल्या मेकअपमुळे दोघांचं खोटं उघड झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -