घरमहाराष्ट्र...म्हणून रात्रभर साईबाबांचे मंदिर राहणार बंद

…म्हणून रात्रभर साईबाबांचे मंदिर राहणार बंद

Subscribe

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या गुरूपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने राज्यातूनच नव्हे तर देशासह जगभरातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. शिर्डी मंदीर संस्थेतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. पण, यंदा मात्र साईभक्तांना थोडसं नाराज व्हावं लागणार आहे. कारणही तसचं आहे. यंदा चंद्रग्रहण असल्याने शेजारतीनंतर मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच ग्रहणामुळे मंदिर पूर्ण रात्र बंद राहणार आहे.

हेही वाचा – क्रूर पतीने पत्नीला सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरुन ढकलले

दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही साईबाबा मंदिरातर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर या उत्सवाला सुरूवात झाली. त्यानंतर मंदिरातून पोथी आणि साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. गुरूपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील भाविकांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे. या सोहळ्याला जवळपास ४ ते ५ लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

मंदिर सजले आकर्षक सजावटीने

गुरूपौर्णिमेनित्त शिर्डीतील साईबाबा मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते. यंदा मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिरातील गुरूस्थान येथेही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान उद्या गुरूपौर्णिमा असल्याने शिर्डीत दाखल होणाऱ्या भक्तांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -