घरमहाराष्ट्रताडोबा अभयारण्यात वाघिणीचा मृत्यू

ताडोबा अभयारण्यात वाघिणीचा मृत्यू

Subscribe

दिवसेंदिवस कमी होत चाललेली व्याघ्र संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यातच दररोज वाघाच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये अडकल्यामुळे मृतावस्थेत आढळली. वाघिणीचा हा मृत्यू नैसर्गिक नसून, शिकार करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताडोबा अभयारण्यात वाघाचा मृत्यू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील खातोडा कोअर झोनमध्ये अडकलेली ही वाघीण २ वर्षांची आहे. ही वाघीण तारांमध्ये दोन दिवसांपूर्वीच अडकली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कक्ष क्रमांक १२३ या ठिकाणी हरणे मारण्यासाठी जे फासे लावण्यात येते. ते फासे आढळून आल्याचे दिसत आहे. या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असून ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे, असं इथल्या वन अधिकाऱ्याचे म्हणणं आहे. वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीची घटना असली तरी शनिवारी पहाटे ही घटना समोर आली. घटनेठिकाणी वन्य अधिकारी पोहचले आहेत. यात मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. आर. प्रवीण यांच्यासह अनेक वनअधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -