घरमहाराष्ट्रकोल्हापूर पालकमंत्रिपद काँग्रेसचे निर्णय काय तो आम्ही घेऊ-थोरात

कोल्हापूर पालकमंत्रिपद काँग्रेसचे निर्णय काय तो आम्ही घेऊ-थोरात

Subscribe

महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूर काँग्रेसच्याच वाट्याला आलं आहे. कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार यावर आम्हीच निर्णय घेऊ, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्हाला 12 पालक मंत्रिपदे मिळाली आहेत. यात कोल्हापूर काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असेल याचा आम्ही निर्णय घेऊ. सध्या मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. मात्र, असे असले तरी माझ्या ऐवजी आमचा कोणताही एक मंत्री कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेईल आणि काम करेल. यात काही रागवणे नाही, रुसणे नाही.

- Advertisement -

नारायण राणे भाजपमध्ये जाऊन अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता काय आहे हे मला माहिती आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राणेंना टोला लगावला. भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईवरून हात फिरवण्याचे महत्त्व आहे. मात्र, त्याला विशेष वेगळे म्हणून पाहायची गरज नाही, असे म्हणत त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. ते स्वराज्यासोबतच सुराज्यही होते. इथे मात्र उलटे करण्यात आले. देश चांगला सुरू होता, त्याला कठीण परिस्थितीत नेण्याचे काम करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -