घरदेश-विदेशभाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळणार; आठवलेंना विश्वास

भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळणार; आठवलेंना विश्वास

Subscribe

दिल्लीतील हिंसाचरावरुन आठवलेंचा आपवर निशाणा

दिल्ली हिसांचरावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर घणाघात केला. हा हिंसाचार आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने घडविला असल्याच आरोप करतानाच सर्वांनी शांतेतत आंदोलन करण्याचा आवाहन त्यांनी यावेळी केले. तर आगामी महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास देखील शुक्रवारी मुंबईत व्यक्त केला.

आगामी काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शुक्रवारी रामदास आठवले यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. ही भेट सकारात्मक झाली असल्याचा सांगतानाच आपल्या उमेदवारीला काहीच अडचण नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर अधिकृत उमेदवारी जाहीर होताच, आपण आपला अर्ज दाखल करु, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, सीएए वरुन कोणीही घाबरुन जाण्याचा प्रश्न येत नाही. कोणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. लोकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तर भीमा कोरेगाव आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. पण आता फक्त आर्ध्याच केसेस मागे घेण्यात आल्या आहेत. इतरही केसेस लवकरात लवकर मागे घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर इंदु मिलमध्ये होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली असून स्मारक येत्या दोन वर्षांत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचप्रमाणे या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करा, अशी मागणी त्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा केली.

सर्व जातीची जनगणना हवी

राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारला नुकतीच ओबीसी समाजाची विशेष जनगणना करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने ही मागणी फेटाळल्यानंतर याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सर्व जातीच्या आधारे जनगणना करण्यासंदर्भात मागणी केली आहे. यासंदर्भात आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंना मुदतवाढ नाही!

या सरकारला लांब पल्ला गाठता येणार नाही

राज्यातील सरकार हे सध्या तीन पावलांवर सुरु असलेले सरकार आहे. या सरकारला लांब पल्ला गाठता येणार नसल्याची टीका यावेळी रामदास आठवले यांनी केली. सध्याच्या या सरकारबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून या सरकामध्ये अनेक वाद असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -