आमीर खानच्या बंगल्यासमोरील झाडाने घेतला महिलेचा बळी

Satara
छायाचित्र प्रतीकात्मक

पाचगणीवाई रस्त्यावरील अभिनेता आमीर खान यांच्या बंगल्यासमोरच्या झाडाची वाळकी फांदी सौ. किरण स्वप्निल माने (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) या पर्यटक महिलेच्या अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झालायाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की किरण माने या पती स्वप्निल यांच्यासोबत महाबळेश्‍वर, पाचगणीत फिरायला आल्या होत्या.

त्यांच्यासोबत आणखी चार जण होते. महाबळेश्‍वरमध्ये फिरून झाल्यानंतर त्यांनी तेथे मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी फिरत हे सर्व जण पाचगणीला आले.

पाचगणीहून पुण्याकडे मोटारसायकलवरून (एमएच-14-एचजे– 8858) हे दाम्पत्य निघाले असता अभिनेता आमीर खान यांच्या बंगल्यासमोर गाडीवर झाडाची वाळकी फांदी अचानक कोसळली. ही फांदी सौ. माने यांच्या अंगावर कोसळून त्या जबर जखमी झाल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत स्वप्निल माने यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here