घरताज्या घडामोडीमुंबईतील राणीच्या बागेत देशातील पहिले 'मुक्त पक्षी विहार'

मुंबईतील राणीच्या बागेत देशातील पहिले ‘मुक्त पक्षी विहार’

Subscribe

देशातील पहिले मुक्त पक्षी विहार मुंबई येथील भायखळा याठिकाणी असलेल्या 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय' येथे उभारण्यात आले आहे.

देशातील पहिले मुक्त पक्षी विहार मुंबई येथील भायखळा याठिकाणी असलेल्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय’ येथे उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ‘मुक्त पक्षी विहाराचे’ प्रजासत्ताक दिनी लोकार्पण करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदाच होत असलेले पक्ष्यांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण ‘मुक्त विहार’ दालन असणार आहे. सलग दोन वर्षे बांधकाम आणि उभारणी सुरु असलेल्या आणि सुमारे ५ मजली इमारतीच्या उंचीएवढ्या असणाऱ्या या ‘मुक्त पक्षी विहारा’त विविध प्रजातींचे सुमारे १०० पक्षी एकत्र असणार आहेत. तसेच या मुक्त विहारात असलेल्या पुलावरुन भ्रमंती करत पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची पर्यटकांना संधी मिळणार आहे.

पर्यटकांना प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेता येणार

या दालनांमध्ये नव्यानेच आगमन झालेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांचा समावेश असणार आहे. हे प्राणी अधिक जवळून आणि चांगल्या पद्धतीने बघता यावेत, यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात काच बसविण्यात आल्याने सेल्फी प्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येणार आहे.

- Advertisement -

कसे असेल मुक्त पक्षी विहार दालन

  • भारतात पहिल्यांदाचा उभारण्यात आलेले ‘मुक्त पक्षी विहार’ दालन हे ४४ फुट उंचीचे आहे..
  • साधारणपणे ५ मजली इमारती एवढ्या उंचीचे आहे.
  • तब्बल १८ हजार २३४ चौरस फुट क्षेत्रफळ असणा-या या मुक्त पक्षी विहारात देश विदेशातील वेगवेगळ्या प्रजातींचे व प्रामुख्याने पाणथळ जागांच्या जवळ राहणारे सुमारे १०० छोटे -मोठे पक्षी आहेत.
  • बजरीगर, क्रौंच, हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा, सारस, मकाव यासारख्या विविध पक्ष्यांचा समावेश आहे.
  • या मुक्त विहारामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी झाडांवरती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची व्यवस्था असण्यासोबतच पक्ष्यांचा घरट्यांचीही काळजी घेण्यात आली आहे.
  • विहारामध्ये १६ फुट उंचीवरुन वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळ देखील आहे.

    हेही वाचा – राज्यातील ५४ पोलीसांना राष्ट्रपती पदक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -