शनिवारी बेस्टच्या १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; १९० कर्मचारी करोनाग्रस्त!

Mumbai
best

कोरोना विरुद्धच्या लढाईतील बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. बेस्टमधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. शनिवारी बेस्टमध्ये १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेस्टमधील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल १९० वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, मंत्रालय, महापालिका कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा देणारे सेवेकरी जास्त आणि बसेसची संख्या कमी यामुळे बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. बेस्टमध्ये शनिवारी १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बेस्टमधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १९० वर पोहोचली आहे. तर ९० जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. आतापर्यत बेस्टमध्ये ८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here