घरमुंबईमुंबईत फटाक्यांमुळे ३ जण जखमी

मुंबईत फटाक्यांमुळे ३ जण जखमी

Subscribe

फटाक्यांमुळे मुंबईत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या तिघांवर देखील भायखळ्याच्या जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

सध्या राज्यासह मुंबईत दिवाळीचा सण अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. यात लहान मुलांची दिवाळी तर फटाके फोडल्याशिवाय होत नाही. पण, फटाके फोडणं हे खरंतर जीवावर बेतू शकतं, हे जरी माहित असलं तरी लहान मुलं अगदी आनंदाने फटाके फोडतात आणि जखमी होतात.

फटाका फोडताना डोळ्याला दुखापत

फटाका तोंडात फुटल्याने काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातील ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतातान मुंबईतही आतापर्यंत फटाक्यांमुळे तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. या तिघांवरही भायखळ्याच्या जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सर्वात पहिली घटना घडली नरकचतुर्दशीच्या दिवशी. ठाण्यातील विनय केणी हा १४ वर्षांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता. पण, फटाक्याच्या अचानक स्फोटामुळे विनयच्या डोळ्यावर अचानक दगड उडाला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जे.जे रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. सध्या विनयवर जे.जे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे

याविषयी जे.जे. रूग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं की, “ सकाळी फटाके उडवताना त्याच्या डोळ्यात खडा गेला होता. डोळ्यात खडा गेल्याने त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. सध्या या मुलावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विनयच्या डोळ्याचा सीटीस्कॅन करून तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जर त्याच्या डोळ्यात खडा असेल तर तो काढला जाईल. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ७ ते ८ दिवस ठेवण्यात येणार आहे. त्याच्या डोळ्याच्या प्रकृतीबाबत नेमकं अजून सांगता येत नाही. त्यामुळे मुलांवर आई-वडिलांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. ”

आणखी दोन जण जखमी

र, जे.जे रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यामुळे जखमी झालेल्या नैतिक चिंताकिंडी या ९ वर्षीय मुलावर ही जे.जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मुलाच्या तोंडावरच फटाका फुटल्याने त्याला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नैतिकच्या हातावर आणि चेहऱ्यावर शिवाय उजव्या डोळ्याला ही दुखापत झाली आहे. नैतिकच्या वडिलांनी त्याला जे जे रुग्णालयात दाखल केले होते. तर, तिसऱ्या घटनेत वनिता राठोड (३५) यांच्या उजव्या हातावर फटाका उडल्याने जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -