घरCORONA UPDATEमहापालिका शाळांमध्ये उभारणार ३७० टॉय लायब्ररी

महापालिका शाळांमध्ये उभारणार ३७० टॉय लायब्ररी

Subscribe

महापालिका शाळांमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३७० टॉय लायब्ररी बनवण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून या टॉय लायब्ररीचा लाभ होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मागील अनेक तीन ते चार वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या टॉय लायब्ररीची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे. महापालिका शाळांमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३७० टॉय लायब्ररी बनवण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून या टॉय लायब्ररीचा लाभ होणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध भाषिक बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बाल सुलभ चित्रे तसेच विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक खेळणी उपलब्ध करून देण्यासाठी या टॉय लायब्ररीचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

विशेष म्हणजे या टॉय लायब्ररीसाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये निविदा मागवण्यात आली होती. त्यानंतर पुढील आठ महिन्यांनंतर आता प्रस्ताव तयार केला गेला. या त्यातही एकमेव कंत्राटदार असलेल्या कंपनीलाच हे काम देण्यात आली आहे. आठ महिन्यानंतरही प्रशासनाने या एकमेव कंत्राटदाराऐवजी स्पर्धात्मक निविदा मागवण्यासाठी फेरनिविदा मागवण्याचा प्रयत्न न करता बोली लावणाऱ्या एकमेव कंपनीलाच काम देण्याचा घाट घाटला आहे. टॉय लायब्ररीची मुख्य मागणी तत्कालिन सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांची होती. त्यानुसार त्यांनी या अँटाँपहिल येथील दफनभूमीच्या जवळील जागेतील बालवाडीत ही टॉय लायब्ररी उपलब्ध करून दिली होती. परंतु पहिली टॉयलायब्ररी अद्यापही बंदच आहे.

- Advertisement -

टॉय लायब्ररीमध्ये कोणती असणार खेळणी

टू वे एसल बोर्ड, इंटरलॉकींग मॅट-विथ अल्फाबेट्स, इंटरलॉकींग मॅट- विथ मॅटस विथ नंबर्स, हिंदी अल्फोबेटस, एबॅकस स्टॅण्ड, बिल्डींग ब्लॉक- बीग कलर साईज, फोम बोर्ड, ब्लॉक टॉय, लेटर राईट-नंबर ट्रेसिंग, गुड मॅनर्स कट आऊट, पपी राईडऑन, फ्रुटस ट्रे, वेजीटेबल ट्रे, वाईल्ड एनिमल्स ट्रे, डोमेस्टिक एनिमल्स ट्रे, बर्डस ट्रे, ट्रान्सपोर्ट ट्रे हॅलिकॉप्टर, नॅशनल सिम्बॉल्स, फॅमिली, लेटस फिक्स, द पिंक टॉवर, लेसींग बोर्ड, शेप्स सॉटींग बोर्ड, पेग बोर्ड, शेप हट, भातुकली बिग, ३६ पेगस, खलबत्ता, पोळपाट लाटणे,  फेस्टीवल, खंजिरी आदी ५२ खेळण्याचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -