घरमुंबईधक्कादायक! महिलेच्या पित्ताशयातून निघाले ५५० खडे

धक्कादायक! महिलेच्या पित्ताशयातून निघाले ५५० खडे

Subscribe

नवी मुंबईत एका वृद्ध महिलेच्या पित्ताशयात खडे असल्याचं निदान झाले. तिच्या पित्ताशयात तब्बल ५५० खडे आढळले आहेत.

नवी मुंबईत परिसरात राहणाऱ्या ७८ वर्षांच्या राशी मेहरा (नाव बदललेले) यांना अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. अनेक डॉक्टरांकडून उपचार करून घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शिवाय, जेष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना गॅस आणि पोटदुखीचा त्रास असेल म्हणून उपचार सुद्धा सुरु होते. मात्र, त्यांची तब्येत अधिकच बिघडल्यानं त्यांना खारघरच्या निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. विविध वैद्यकीय तपासण्या तसेच सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन केल्यानंतर तिच्या पित्ताशयात खडे असल्याचं निदान झाले. पण, एका वयोवृद्ध महिलेच्या पित्ताशयात इतके खडे असण्याचं हे दुर्मिळ असं प्रकरण असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. यावर शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग होता. कुटुंबाच्या परवानगीने राशी यांच्यावर शस्त्रक्रिया करून खडे काढण्यात आले. त्यावेळी, तब्बल ५५० खडे त्यांच्या पित्ताशयातून निघाले.

तीन तास शस्त्रक्रिया

याविषयी खारघरच्या निरामय हॉस्पिटलचे संचालक आणि लॅप्रोस्कॉपीक शल्यचिकित्सक डॉ. अमित थडानी यांनी सांगितलं की, “पित्ताशयातील खडे काढणे ही बाब डॉक्टरांसाठी सोपी असली तरीही या केसमध्ये या महिलेचे पित्ताशय हे पूर्णपणे जंतुसंसर्गामुळे बाद झाले होते. त्यामुळे, कुटुंबाच्या परवानगीने राशी मेहरा यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे पित्ताशय काढून टाकण्यात आले. तब्बल ५५० खडे त्यांच्या पित्ताशयातून निघाले. भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रात एका वयोवृद्ध महिलेच्या पित्ताशयात इतके खडे असण्याची ही दुर्मिळ केस आहे. सर्वसाधारणपणे रुग्णांच्या पित्ताशयात १ किंवा १० खडे दिसून येतात. अत्यंत दुर्मिळ प्रकरणात १०० खडे असल्याचं आढळून आलं आहे. पण, या रुग्णाच्या पित्ताशयात २ ते ३ मिलीमीटरचे तब्बल ५५० लहान खडे होते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत अक्युट कॅल्क्युलसकोलेसिस्टिसीस असं म्हणतात. पाच पैकी एका रुग्णात ही समस्या दिसून येते. जवळपास ३ तास या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.”

- Advertisement -

‘‘पित्ताशयात खडे होण्याचा त्रास महिलांमध्ये अधिक दिसून येतो. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या पित्ताशयात इतक्या मोठ्या संख्येने खडे होण्यामागे अनेक कारणं आहेत. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असणं किंवा पित्ताचा त्रास असणं. इतकंच नाहीतर बदलती जीवनशैलीदेखील या परिस्थितीला कारणीभूत ठरते. त्यामुळे प्रत्येकानं पौष्टिक आणि सकस आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे.” – डॉ. अमित थडानी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -