Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई लोकलचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार - राज्य सरकार

लोकलचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार – राज्य सरकार

राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे मार्चपासून बंद असलेली मुंबईची उपनगरीय लोकल सेवा लवकरच सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. कारण लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत घेण्यात येईल असं राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितलं. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या उपनगरांतील लाखो प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि स्त्रियांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी आहे. दरम्यान, उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका वकिलांच्या संघटनेने दाखल केली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना विशिष्ट वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र सर्वांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा कधी सुरु होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधी मिळणार याबाबत न्यायालयाने महाधिवक्त्यांकडे विचारणा केली. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत एका चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं महाधिवक्त्यांनी सांगितलं होतं. मुख्य न्यायमूर्तीनी शुक्रवारच्या सुनावणीत महाधिवक्त्यांचे त्याकडे लक्ष वेधलं. त्यावर न्यायालयाने दिलेली मुदत मंगळवारी संपत असून तोपर्यंत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवण्याची विनंती केली.

- Advertisement -

 

- Advertisement -