घरमुंबईडोंबिवलीत महिलांचा पिंक वोटिंग बूथला चांगला प्रतिसाद

डोंबिवलीत महिलांचा पिंक वोटिंग बूथला चांगला प्रतिसाद

Subscribe

गुलाबी खोली, त्यात गुलाबी सजावट आणि गुलाबी कपडे परिधान केलेल्या महिला कर्मचारी, हे कुठल्या कार्यक्रमाचे वर्णन नसून तर महिला मतदारांसाठी डोंबिवलीतील स.वा. जोशी शाळेत हे विशेष गुलाबीमय मतदान केंद्र (पिंक वोटिंग बूथ) साकारले होते. मतदान केंद्रात येणार्‍या प्रत्येक महिलेला गुलाब आणि सोनचाफ्याची फुले देऊन स्वागत करण्यात आले.
देशातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी त्यातही महिलांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण सहा सखी केंद्र उभारण्यात आली होती. डोंबिवलीतील शाळेत गुलाबी थीमवर आधारित महिला मतदारांसाठी केंद्र तयार करण्यात आले होते. त्यामुळे हे संपूर्णपणे आकर्षण ठरले होते. मतदान केंद्राच्या परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

निवडणूक आयेागाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र हे महिला अधिकार्‍यामार्फत संचलित करण्यात आले. त्यानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथमध्ये फादर अग्नेल शाळा चिंचपाडा, उल्हासनगर मनपा 177, प्रशासक शहर वसाहत 237, कल्याण पूर्वेत नूतन ज्ञानमंदिर तिसगाव, डोंबिवलीत एस.व्ही.जोशी हायस्कूल, कल्याण ग्रामीणमध्ये लोढा वर्ल्ड स्कूल पलावा आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील मनिषा विद्यालय कळवा या सहा केंद्रांवर अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्व कामकाज महिलावर्गांनी सांभाळले. डोंबिवलीतील पिंक वोटींग बूथ हे विशेष लक्षवेधी ठरले. निवडणूक आयोगाच्या सखी बूथ संकल्पनेनुसार प्रत्येक मतदारसंघात एक सखी बूथ साकारण्यात आले होते. डोंबिवलीत 222 नंबरचे केंद्र सखी बूथ तयार केले. तसेच सर्व कर्मचारी आणि महिला केंद्राध्यक्षही महिला होत्या. यामुळे महिला मतदारांमध्ये उत्साह होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -