घरमुंबईअंधेरीत गोळीबार; एकाचा मृत्यू

अंधेरीत गोळीबार; एकाचा मृत्यू

Subscribe

अंधेरी साकीनाका परिसरात संपत्तीच्या वादातून एकाची गोळीबार करुन हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अंधेरी साकीनाका परिसरात गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून एका इसमाने स्वत:च्या नातेवाईकाचीच गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत इब्लिस खान यांची हत्या करण्यात आली आहे. साकीनाका परिसरातील नहार सोसायटीत गोळीबार करुन हत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा आरोपी हत्या करुन स्वत:साकीनाका पोलिसांना शरण गेला आहे. पोलिसांनी त्याला अटके केली असून पुढील चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. तसेच परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -