आपलं महानगर इम्पॅक्ट! केडीएमसीकडून धडक कारवाई 

सामान्य नागरिकांबरोबरच आता पालिका प्रशासनाने सरकारी कार्यालयाकडे कारवाईचा बडगा उगारला आहे.

mumbai
Impact of Aapla Mahanagar : Red light area shut down in hanuman galli
पाणी पुरवठा थकबाकीदारांविरोधात पालिका प्रशासनाने धडक पावले उचलली असतानाच, आता सरकारी कार्यालयाच्या थकबाकीविरोधातही प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. पोलीस तहसीलदार पंचायत समिती आणि टेलिफोन एक्सचेंज या सरकारी कार्यालयांची, पाणी पुरवठा थकबाकीप्रकरणी पालिकेने त्यांचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. सरकारी कार्यालयाचा पाणी पुरवठा खंडीत होण्याची पालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार आहे. सरकारी कार्यालयाच्या पाणी पट्टी थकबाकीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त आपलं महानगरने दिलं होतं. पाणी पट्टीच्‍या वसुलीसाठी महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी आढावा बैठक घेऊन पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वसामानय नागरिकांसह सरकारी कार्यालयावरही कारवाईची मोहिम राबविण्यात यावी, अशी सुचना आयुक्तांकडून मिळाल्यानंतर पालिकेचे पाणी पुरवठा विभागचांगलेच कामाला लागले आहेl.

आपलं महानगरचा दणका 

यंदाच्या वर्षी पाणी बिल वसुलीचे ७५ कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत पाणी बिलाची ५५ कोटी १५ लाख रूपये वसूल केले आहेत. सामान्य नागरिकांबरोबरच आता पालिका प्रशासनाने सरकारी कार्यालयाकडे कारवाईचा बडगा उगारला आहे. कल्याण शहरातील पोलीस कॉलनी, कल्याण तहसील कार्यालय,  पंचायत समिती, टेलिफोन एक्सचेंज या सरकारी कार्यालयांची लाखो रूपयांची थकबाकी होती. मात्र, तरीही पालिकेकडून अनेक वर्षापासून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे थकबाकीची रक्कम कोटीच्या घरात गेली आहे. पालिका प्रशासनाकडून केवळ नोटीसा देण्याचेच काम केले जायचे. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय व सरकारी कार्यालयांना दुसर न्याय असा प्रकार अनेक वर्षापासून सुरू होता. आपलं महानगरने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका आयुक्त बोडके यांनी सरकारी कार्यालयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता बाळासाहेब जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली पाणी विभागाच्‍या कर्मचा-यांनी  थकबाकीदार असलेल्‍या शासकीय कार्यालयांच्‍या नळ जोडण्‍या खंडीत केल्‍या आहेत .

नेमकी थकबाकी किती?

  • पोलीस कॉलनी (कल्याण) – ८ कनेक्शन – १.१९ कोटी
  • पंचायत समिती कार्यालय – १ कनेक्शन – ६.७६ लाख
  • तहसिलदार कार्यालय – १ कनेक्शन – ६.३१ लाख
  • टेलिफोन एक्सचेंज – ७ कनेक्शन – १.६० लाख

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here